• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

धाराशिवमध्ये इंधन टंचाईच्या अफवा ; पुरवठा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती

Terna Vruttant by Terna Vruttant
May 6, 2026
in धाराशिव, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Rumours in dharashiv about petrol diesel shortage

Rumours in dharashiv about petrol diesel shortage

3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : सद्यस्थितीत काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अतिरिक्त साठा करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. मात्र, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

या पार्श्वभूमीवर ५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तेल कंपन्यांच्या (एच.पी.सी.एल., बी.पी.सी.एल.,आय.ओ.सी.एल.) विक्री प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित कंपन्यांचे डेपो पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, पंपधारकांच्या मागणीनुसार आवश्यकतेनुसार पेट्रोल व डिझेलचा पुरवठा तात्काळ करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

दरम्यान,एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात पेट्रोल व डिझेल विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. यामागे नागरिकांनी अफवांच्या पार्श्वभूमीवर केलेली अतिरिक्त खरेदी कारणीभूत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे सर्व पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिल्या आहेत.

तसेच, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पेट्रोल पंपांची सखोल तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान कोणताही दोष आढळल्यास संबंधित पंप चालकांवर पेट्रोलियम अधिनियम २००२ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसून सर्व पंपांवर नियमित पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

Previous Post

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

Next Post

विमा कंपनीची चाल ढकल थांबणार, पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी

Next Post
Dharashiv Pik Vima Supreme Court case

विमा कंपनीची चाल ढकल थांबणार, पुढील तारखेला 'अंतिम' सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

supreme court

Supreme Court : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम

12 months ago
Rahul Gandhi security breach

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन; 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्‍यावर

10 months ago
Malegon Bomb Blast court Verdict

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

12 months ago
Shardiya Navratri 2025

तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस सुरुवात,शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी नऊ दिवस देवी निद्रेत

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.