• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, May 18, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

Terna Vruttant by Terna Vruttant
March 23, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
543
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : प्लेसमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फार्मसी विभागातील तब्बल ४५ विद्यार्थ्यांची पुणे येथील एजिओ या नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत निवड झाली आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच औषधनिर्माण (फार्मसी) क्षेत्रातही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

यापूर्वीही येथील विद्यार्थ्यांची रिलायन्स फार्मास्युटिकल, टीसीएस, वखार्ड, श्रेया लाइफ सायन्स, एमक्युर, लुपिन, सिप्ला यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे.

Related posts

Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

May 18, 2026
Dharashiv Pik Vima Supreme Court case

विमा कंपनीची चाल ढकल थांबणार, पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी

May 6, 2026

या यशाबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच उद्योगांना अपेक्षित असलेली कौशल्ये शिकवतो. याचा परिणाम म्हणून तांत्रिक पारंगतता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी दिवसेंदिवस नामांकित कंपन्या महाविद्यालयाच्या संपर्कात येत आहेत. येत्या महिन्यांत आणखी दहाहून अधिक फार्मसी कंपन्यांचे प्लेसमेंटसाठी प्रस्ताव आले असून, त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना सक्षम वेतनासह रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या भरती प्रक्रियेत तांत्रिक कौशल्य, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास या बाबींवर विशेष भर देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर मुलाखतीच्या सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त केले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये धनश्री पावले, आकांक्षा कुलकर्णी, श्रेया धारुकर, सानिका वडणे, पवन माने, ओंकार गंजे, श्रावणी भोसले, संकेत वाघमारे, समृद्धी पाटील, अंकित क्षीरसागर, सोनल हिंगमिरे, विशाखा वाघमारे, रोहन करमाने, ज्ञानेश्वर जाधव, प्राजक्ता कुमटी, निकिता मुळे, माधुरी घुगे, समृद्धी जमदाडे, स्वप्नाली गडकर, कल्याणी शिंदे, सुनील डोळे, सायली खोपडे, ऋतुजा दिवाने, अंकिता गुजर, आकांक्षा देशमुख, पवन चव्हाण, श्रेया पाटील, अजित लांडगे, अश्विनी पालकर, नरेंद्र मंडीवाल, प्रतिमा कोळेकर, सृष्टी कोळी, वैष्णवी डोंगरे, आविष्कार हाके, अनिकेत साबळे, सोनू चव्हाण, प्रियंका शिंदे, प्राची इंगोले, आकांक्षा दंडनाईक, वैभव गुंजाळ, सलोनी सोनवणे, अमृता माने, सानिका पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हा प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संभव फाउंडेशन, बंगलोर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री. अशोक जगताप, फार्मसी विभागाचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ. चिवटे व श्री. मुंढे यांनी या ड्राइव्हसाठी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

बार्शीत एजंटांच्या मनमानीमुळे बांधकाम कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच

Next Post

GPAT २०२६ मध्ये तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाची दमदार कामगिरी

Next Post
Terna Pharmacy

GPAT २०२६ मध्ये तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाची दमदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA - Ranajagjitsinha Patil

अद्ययावत वैद्यकीय संकुल व आयटीआय उभारणीचा मार्ग मोकळा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

7 months ago
Dharashiv Collector, SP take review for ganeshotsav

धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी; कलेक्टर, एसपिंनी घेतला आढावा

9 months ago
Dharashiv Ujni car accident

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

1 month ago
Supreme court

जि. प., पं. स. निवडणुकांमध्ये 2025 च्या नियमांनुसार आरक्षण

7 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी
  • विमा कंपनीची चाल ढकल थांबणार, पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी
  • धाराशिवमध्ये इंधन टंचाईच्या अफवा ; पुरवठा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

May 18, 2026
Dharashiv Pik Vima Supreme Court case

विमा कंपनीची चाल ढकल थांबणार, पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी

May 6, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.