• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

Terna Vruttant by Terna Vruttant
June 12, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
Terna Enggineering College Dharashiv

Terna Enggineering College Dharashiv

0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव, इन्फोसिस आणि डीटीई महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा ऑगस्ट २०२५ ते मे २०२६ या कालावधीत महाविद्यालयातील २९ विद्यार्थ्यांनी इन्फोसिस या जागतिक ख्यातीच्या आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करून महत्त्वपूर्ण औद्योगिक अनुभव संपादन केला.

या इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना कंपनीतील अनुभवी अभियंते, व्यवस्थापक आणि तज्ज्ञांसोबत प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. उद्योगक्षेत्रात आवश्यक असलेले ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक विचारसरणी विकसित करण्यासाठी अशा इंटर्नशिपचा मोठा फायदा होतो.

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व तांत्रिक समस्यांवर आधारित प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला. पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी, ऑटोनॉमस सिस्टिम्स, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तेल पाइपलाइन गळती शोधणे, शहरी भागासाठी राइड-शेअरिंग अॅप विकसित करणे, तसेच हॉटेल आणि दुकानांच्या नफा विश्लेषणासाठी नेटलीक्स अॅनालायझर अशा विविध प्रकल्पांवर त्यांनी काम केले.

इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड कंपनीने निर्धारित केलेले अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करण्यात आली. इंटर्नशिप कालावधीत दररोज सॉफ्टवेअर प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा कंपनीच्या मेंटॉरसोबत घेतला जात होता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

क्लाउड कम्प्युटिंग, पायथॉन प्रोग्रामिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फुल-स्टॅक डेव्हलपमेंट, जावा टेक स्टॅक, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या उद्योगक्षेत्रात मागणी असलेल्या तंत्रज्ञानांवर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष काम केले. यामुळे भविष्यातील प्लेसमेंट आणि दर्जेदार प्रकल्पांच्या संधींसाठी त्यांना मोठी मदत होणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील ओंकार लकडे, भूमिका इंगळे, वैष्णवी पाटील, संगणक विभागातील रोहिणी पांढरे, संध्याराणी पवार, साक्षी शिंदे, स्नेहा बुरगुटे, अंजली जकाते, अल्सफा अरब, प्रताप बोंदर तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातील निकिता जगताप, तेजल ससाणे, विशाखा चंदने, राजनंदिनी शिंदे, अनिशा अंबुरे, संजीवनी शेळके, सलोनी सुरडकर, सुमित ढेंगळे, श्रावणी सूर्यवंशी, अदिती घोगरे, साक्षी सलगरे, साक्षी गोटे, समृद्धी मसलगे, राजनंदिनी मोकाशी, अंजली खारगे, सुजित सूर्यवंशी, मानिनी ढाकरे, अर्पिता मुळे आणि सानिया मुल्ला यांनी ही इंटर्नशिप पूर्ण केली. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

महाविद्यालयाचे इन्फोसिस एसपीओसी म्हणून प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली. कौशल्याधारित उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग घेतल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

financial assistance to new entrepreneurs

बँकांनी नव्या उद्योजकांना अर्थसहाय्य करावे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश

11 months ago
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

11 months ago
sanjay shirsath

महायुतीच्या मंत्र्यांमध्ये जुंपली; संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात कामकाजावरून वाद

11 months ago
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

3 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.