• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

विमा कंपनीची चाल ढकल थांबणार, पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी

Terna Vruttant by Terna Vruttant
May 6, 2026
in धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Dharashiv Pik Vima Supreme Court case

Dharashiv Pik Vima Supreme Court case

19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना लवकरच दिलासा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती 

धाराशिव : खरीप २०२० मधील सोयाबीनच्या पीक विम्यावरून विमा कंपनीने तांत्रिक अडथळे निर्माण करीत केलेली चाल ढकल आता थांबणार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी घेण्याचे आदेशित केले आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विमा कंपनीचे सर्व तांत्रिक दावे ऐकून घेतले, उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर या प्रकरणावर ‘अंतिम सुनावणी’ घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील चार वर्षांपासून लढा देणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान, विमा कंपनीने पुन्हा एकदा तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत उच्च न्यायालयात जमा असलेल्या ७५ कोटी रुपयांच्या बाबतीत तीव्र आक्षेप घेत मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांचा अवमान झाला असल्याचा कांगावा करत गोंधळ निर्माण करण्याचा आणि खटला लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी बांधवांच्या वतीने बाजू मांडणारे केंद्र सरकारचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. बलबीर सिंग यांनी याबाबत असलेले वास्तव मा. सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आणत सुरुवातीपासून कंपनी कशी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे हे लक्षात घेऊन अंतिम सुनावणीला लवकरात लवकर वेळ देण्याबाबत न्यायालयाकडे आग्रह केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने उन्हाळी सुट्टीनंतर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. 

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

आमदार पाटील यांनी दिल्लीत विधिज्ञासोबत आखलेली रणनीती आली कामी

खरीप २०२० आणि २०२१ च्या प्रलंबित विम्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्लीत उपस्थित राहत काल व आज केंद्र सरकारचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. बलबीर सिंग आणि अ‍ॅड. सुधांशू चौधरी,अ‍ॅड.शिंदे यांच्यासह लीगल टीम सोबत झालेल्या बैठकीत आखलेली रणनीती फळाला आली असून, विमा कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात मोठी आघाडी घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिल्लीपर्यंत लढा

विमा कंपन्यांनी कितीही तांत्रिक अडथळे आणले, तरी शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. उच्च न्यायालयाचा निकाल हा सत्याचा विजय असून, सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांचाच विजय होईल. ठाकरे सरकारच्या काळात या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, मात्र आपण हार मानली नाही. शेतकरी बांधवांच्या मदतीने कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा नेला. आता विमा कंपनीची कोणतीही युक्ती चालणार नाही. उन्हाळी सुट्टीनंतर होणारी अंतिम सुनावणी शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस घेऊन येईल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये इंधन टंचाईच्या अफवा ; पुरवठा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती

Next Post

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

Next Post
Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Nagarparishad Election

धाराशिव नगरपरिषद आरक्षण सोडत; “या” प्रवर्गासाठी सुटले नगराध्यक्ष पदाचे आरक्षण, चुरस वाढली…

9 months ago
Raj Thackeray

“…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”, राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत

1 year ago
Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

2 months ago
Eknath Khadase Press conferance on khewalkar

“रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.