• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, October 15, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
February 12, 2026
in धाराशिव
0
Crop insurance Ranajagjitsinha Patil

Crop Insurance Ranajagjitsinha Patil

52
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : खरीप २०२० हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला निर्णायक यश मिळाले आहे. आपल्या महायुती सरकारने १३४ कोटी ११ लाख ९१ हजार ९३८ रुपये इतका निधी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास अंतिम मान्यता दिली आहे.

मा . सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. खरीप २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होत्या. याविरोधात आपण शेतकरी बांधवांच्या सहकार्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने २४ नोव्हेंबर २०२५ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार, विमा कंपनीचा दुसरा हप्ता रोखून तो थेट शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते.

Related posts

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

October 10, 2026

याच आदेशाची अंमलबजावणी करत, आपल्या महायुती सरकारने बुधवार ११ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यासाठी १३४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. १३४.११ कोटींचा हा निधी कृषी आयुक्तालयाच्या ESCROW बँक खात्यातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांना वर्ग केला जाणार आहे. बजाज अलियांज विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेले ७५ कोटी रुपये आणि त्यावरील व्याजही पात्र शेतकरी बांधवांना वितरित करण्यासाठी वापरले जाणार आहे. त्याची सुनावणी उद्या न्यायालयात होणार आहे. त्याकडेही आपले लक्ष असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच आहे. मागील पाच वर्षांपासून आपण शेतकरी बांधवांच्या सोबतीने सलग जिल्हा प्रशासनाकडे आणि न्यायालयात पाठपुरावा करत होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही विमा कंपनीची याचिका फेटाळल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविम्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता प्रत्यक्ष निधी वर्ग करण्याचा शासन निर्णय निघाल्याने हजारो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Previous Post

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

Next Post

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

Next Post
Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

efforts to bring back Madhuri Hattini

माधुरी हत्ति‍णीला परत आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 year ago
काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश 

काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश 

10 months ago
Ladaki Bahin Yojana e-kyc

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू

1 year ago
Rudra & Bhairav Briged

भारतीय लष्कराची मोठी घोषणा! ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेडचा सैन्यदलात समावेश

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 
  • सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
  • नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.