• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 21, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच, MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा : आ. पाटील 

Terna Vruttant by Terna Vruttant
December 26, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS
0
Kalamb road

Kalamb road

43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर–कल्याण या प्रस्तावित महामार्गाच्या मार्गरेषेत आवश्यक बदल करण्यात यावा, हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून पुढे जावा, अशी ठोस मागणी रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. कळंब आणि परिसराच्या भौगोलिक आणि अभियांत्रिकी दृष्टीने सखोल विचार करता हा मार्ग अधिक व्यवहार्य, किफायतशीर ठरणार आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक मदत होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच नेण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्यात यावा या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे व्यवस्थापकीय संचालकांची (MD) यांच्याशी संवाद साधला. यावेळी तांत्रिक बाबींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळविले आहे.

Related posts

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

तांत्रिकदृष्ट्या पाहता कळंब तालुका हा अन्य भूभागांच्या तुलनेने सपाट आहे. त्यामुळे कट-फिल कामाचे प्रमाण याठिकाणी कमी आहे. परिणामी मर्यादित भूसंपादन आणि मोठ्या तसेच उड्डाणपुलांची आवश्यकता कमी भासेल. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च नियंत्रणात राहून कामाची गती वाढण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या प्राथमिक अभ्यासानुसार कळंब तालुक्यातून मार्ग गेल्यास:

महामार्गाची एकूण लांबी सुमारे 15 ते 20 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी लातूर ते कल्याण प्रवासाचा कालावधीही अंदाजे 30 ते 45 मिनिटांनी कमी होणार आहे.

सरळ, वेगवान व सिग्नल-फ्री मार्गामुळे इंधन खर्चात देखील 8 ते 12 टक्क्यांपर्यंत बचत अपेक्षित आहे.अवजड वाहतूक, मालवाहतूक व लॉजिस्टिकसाठीही हा मार्ग अधिक किफायतशीर ठरणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तपशीलवार सांगितले. 

हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याला विकासाची नवी दिशा देणारा ठरणार आहे. महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून गेल्यास लातूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई–ठाणे–नवी मुंबई या आर्थिक केंद्रांशी थेट व जलद आणि थेट संपर्क निर्माण होईल. परिणामी शेतमालाला मोठ्या बाजारपेठेत जलद प्रवेश मिळणार आहे. उद्योग आणि वेअरहाऊसिंग तसेच सेवा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होईल जेणेकरून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी आपल्या गावाशेजारी उपलब्ध होतील. 

कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक घडामोडींना त्यामुळे मोठी चालना मिळेल. या महत्त्वाच्या मार्गबदलासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सकारात्मक व निर्णायक पाठिंबा मिळेल, असा ठाम विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. लातूर–कल्याण महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच जावा, यासाठी आपले आग्रही प्रयत्न सुरू आहेत आणि जिल्ह्याच्या हिताचा निर्णय निश्चितपणे होईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

Previous Post

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढणार? बोलणी फिस्कटल्याची चर्चा

Next Post
NCP PMC Election

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढणार? बोलणी फिस्कटल्याची चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pump House Inauguration

पडसाळी, दारफळ पंपगृहाचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

11 months ago
Dharashiv Pik Vima Supreme Court case

विमा कंपनीची चाल ढकल थांबणार, पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी

3 months ago
Devendra Fadnavis' FIRST reaction

ओबीसींच्या मतांचा राजकारणासाठी वापर; मुख्यमंत्री फडणवीस यांची मंडल यात्रेवर टीका

11 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सरसकट मदत, आपल्या सर्व मागण्या मान्य – आमदार राणाजगजितसिंह पाटील

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.