दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
स्थानिक पशुधनासाठी चारा राखण्याला प्राधान्य, उल्लंघन केल्यास वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाई
धाराशिव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यात उत्पादित किंवा उपलब्ध असलेला चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उपलब्ध चारा प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि गोशाळांमधील पशुधनासाठी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहन जप्त करण्यासह कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
यंदाच्या हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पशुधनाचे संगोपन आणि त्यांच्यासाठी आवश्यक खाद्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही भागांतून चारा व्यावसायिक तसेच अन्य कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेर नेला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही वाहतूक सुरू राहिल्यास स्थानिक पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५



