• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, September 28, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

पीकविम्यातील तांत्रिक तफावत दूर करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटलांचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

Terna Vruttant by Terna Vruttant
September 28, 2026
in मुख्य बातम्या, कृषी
0
पीकविम्यातील तांत्रिक तफावत दूर करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटलांचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्चित करताना तंत्रज्ञानावर आधारित ‘येस-टेक’ (YES-TECH) पद्धतीमुळे प्रत्यक्ष शेतातील उत्पादन आणि तांत्रिक अंदाजात मोठी तफावत निर्माण होत आहे. हा मुद्दा आपण राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला होता. याच मुद्द्याची आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. तांत्रिक त्रुटी दूर करून राज्यभरातील शेतकरी बांधवांना न्याय देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

खरीप २०२५-२६ मध्ये धाराशिव जिल्ह्यात तांत्रिक उत्पादन निश्चितीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आपण दिनांक २०/४/२०२६ रोजी जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञांच्या पथकाला या विषयात अहवाल तयार करण्यासाठी धाराशिवाला बोलावले होते. हवामानशास्त्रज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांच्या तज्ञ पथकाकडून स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला व या अभ्यासात DSSAT मॉडेलद्वारे निश्चित होणारे उत्पादन, प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग, हवामानातील बदल, अतिवृष्टी, पाणी साचणे, रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि स्थानिक कृषी परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास मांडण्यात आला. या अभ्यासातून तांत्रिक उत्पादन निश्चिती आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये मोठा फरक असल्याचे आपण सर्वप्रथम आकडेवारीसह राज्य सरकारला पत्राद्वारे अवगत केल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. स्वतः कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करून, अधिकृत बैठकीत हा प्रश्न मांडला होता. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती, पीक कापणी प्रयोगातून मिळणारे उत्पादन आणि तांत्रिक पद्धतीने निश्चित होणारे उत्पादन यामध्ये मोठी तफावत असल्याने त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पीकविमा दाव्यांवर होत आहे, असे आपण निदर्शनास आणून देत कृषी विद्यापीठाचा अहवाल मांडला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात धाराशिव येथील कृषी विद्यापीठाच्या अभ्यासाचा उल्लेख करत संबंधित अहवाल देखील पत्र सहा जोडला आहे.

Related posts

भूम-परंडा-वाशीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश, मा. आ. मोटे यांनी मानले सरकारचे आभार

भूम-परंडा-वाशीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश, मा. आ. मोटे यांनी मानले सरकारचे आभार

September 28, 2026
Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026

खरीप २०२६ च्या उत्पादन निश्चितीमध्ये पीक कापणी प्रयोग आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनाचा प्रत्येकी ५० टक्के भार विचारात घेतला जात असल्याने अशा तफावतींचा विमा भरपाईवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मांडलेल्या या भूमिकेमुळे राज्य सरकारच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नाला पुढील स्तरावर आता बळ मिळाले असून, प्रत्यक्ष उत्पादनाच्या आधारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरूच राहणार असल्याची ग्वाहीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

तांत्रिक त्रुटींमुळे भरपाई नाकारलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

‘येस-टेक’ आणि पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या तफावतींचा परिणाम केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून, त्याचा संबंध शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविमा भरपाईशी आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वंकष तपासणी करून उत्पादन निश्चितीच्या पद्धतीत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे. तसेच तांत्रिक त्रुटींमुळे किंवा उत्पादन निश्चितीतील विसंगतींमुळे पीक नुकसान होऊनही विमाभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांची नियमानुसार देय असलेली भरपाई मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली केली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Previous Post

भूम-परंडा-वाशीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश, मा. आ. मोटे यांनी मानले सरकारचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्क : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्क : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

1 year ago
Dharashiv hodpital 350 health camp

पुढील चार महिन्यात ३५० शिबिरांचे नियोजन करा -आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

1 year ago
Sharad Pawar on farmers

अतिवृष्टीग्रस्तांसाठी शरद पवारांकडून पंचसूत्री उपाय

12 months ago
Petrol Diesel Price in Marathi

महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोलची किंमत किती? 

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • पीकविम्यातील तांत्रिक तफावत दूर करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटलांचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
  • भूम-परंडा-वाशीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश, मा. आ. मोटे यांनी मानले सरकारचे आभार
  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

पीकविम्यातील तांत्रिक तफावत दूर करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटलांचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

पीकविम्यातील तांत्रिक तफावत दूर करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटलांचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

September 28, 2026
भूम-परंडा-वाशीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश, मा. आ. मोटे यांनी मानले सरकारचे आभार

भूम-परंडा-वाशीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश, मा. आ. मोटे यांनी मानले सरकारचे आभार

September 28, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.