• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 21, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

विधानपरिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Terna Vruttant by Terna Vruttant
October 21, 2026
in मुख्य बातम्या, POLITICS, महाराष्ट्र
0
विधानपरिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निवडणूक यंत्रणा सज्ज

२७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

Related posts

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानरूपी शस्त्रांचे पूजन!

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानरूपी शस्त्रांचे पूजन!

October 21, 2026
राघूचिवाडी तलावाच्या पाण्यावर चारा लागवडीचा प्रस्ताव

राघूचिवाडी तलावाच्या पाण्यावर चारा लागवडीचा प्रस्ताव

October 19, 2026

मुंबई :महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघांत २ हजार ४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, १० लाख ६८ हजार ७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या पाचही मतदारसंघांतील विद्यमान सदस्यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक घेण्यात येत आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पाच जागांसाठी १८२ उमेदवार

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून ४१, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून ४७ आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार असून, या पाचही मतदारसंघांत मिळून १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर व्यवस्था

पाचही मतदारसंघांमध्ये एकूण १० लाख ६८ हजार ७२ मतदारांची नोंद आहे. यामध्ये पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८८ हजार १९ मतदार, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वात कमी ३५ हजार ८१० मतदार आहेत.

मतदानासाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात ८४२, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ७४१, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ४४५, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ८१ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्व मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

६ डिसेंबरला विद्यमान सदस्यांची मुदत संपणार

विधानपरिषदेच्या ज्या पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे, त्या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे. यामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतीश भानुदासराव चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण गणपती लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत गोविंदराव वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण रामराव सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत दिनकर आसगावकर यांचा समावेश आहे.

Previous Post

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानरूपी शस्त्रांचे पूजन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA Ranajagjitsinha Patil

शेतकऱ्यांच्या मदतनिधीतून कर्जवसुली करू नका, आ. पाटील यांच्या सूचनेनंतर बँकेचे पत्र

1 year ago
Rana dada for Farmers Assistance

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
CBSE Board Exam Time Table

‘सीबीएसई’कडून दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर; राज्य मंडळाचे वेळापत्रक कधी येणार?

1 year ago
Tulja Bhaavani College of Engineering

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच “शासकीय अभियांत्रिकी”, प्रक्रिया सुरु

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • विधानपरिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानरूपी शस्त्रांचे पूजन!
  • राघूचिवाडी तलावाच्या पाण्यावर चारा लागवडीचा प्रस्ताव

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानरूपी शस्त्रांचे पूजन!

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानरूपी शस्त्रांचे पूजन!

October 21, 2026
राघूचिवाडी तलावाच्या पाण्यावर चारा लागवडीचा प्रस्ताव

राघूचिवाडी तलावाच्या पाण्यावर चारा लागवडीचा प्रस्ताव

October 19, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.