• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच “शासकीय अभियांत्रिकी”, प्रक्रिया सुरु

Terna Vruttant by Terna Vruttant
July 31, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS
0
Tulja Bhaavani College of Engineering

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पाठपुरावा

5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. उच्च तंत्र व शिक्षण विभागाने त्यासाठी पाच तज्ञ मान्यवरांची समिती गठित केली आहे. पुढील सहा दिवसात ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शासकीय महाविद्यालय होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हे तिसरे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ठरणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(Tulja Bhaavani College of Engineering)

शासन निर्णयाद्वारे तज्ञांची समिती गठीत; सहा दिवसात अहवाल सादर करणार

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी महत्वाची बैठक झाली. त्यात तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याच्या अनुषंगाने तसेच ही कार्यवाही सुकरपणे पार पडावी याकरिता पाच सदस्यीय तज्ञांची समिती गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवार दि. ३० जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे समिती गठित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक किरण लाढाणे हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर महाराष्ट्र लेखा व कोषागार संचालनालयाच्या प्रतिनिधी डॉ. स्मिता कोकणे, तुळजापूर मंदिर समितीचे विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय डंभारे हे समितीचे सदस्य तर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र आडेकर यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालय राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या अनुषंगाने जो प्रकल्प अहवाल सादर केला आहे, त्याची तपासणी करून ही समिती राज्य सरकारकडे स्वतंत्र अहवाल सादर करणार आहे. पुढील सहा दिवसात ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत राज्य सरकारकडे अहवाल सादर करावा असे उच्चतंत्र शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन आदेशात म्हटले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Related posts

Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
Terna Engg CET admission-guidance-program

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी-2026 प्रवेश प्रक्रियेवर विभागीय सुसंवाद कार्यक्रम

June 4, 2026

जिह्याच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठीच्या पाठपुराव्याला यश- आमदार पाटील

मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांची तुलनेत कमी असलेल्या शासकीय शुल्कामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सोय होऊन या भागाचा शैक्षणिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करावे यासाठी आपला आग्रह होता. त्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, उदय सामंत व विद्यमान मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्याला आता यश मिळताना दिसत आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अर्थकारणाला आणखीन बळकटी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्येही मोठी बचत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्याकरिता मदत होईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे

Previous Post

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

Next Post

कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री

Next Post
Agriculture Minister Dattatray Bharne

कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CBSE Board Exam Time Table

‘सीबीएसई’कडून दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर; राज्य मंडळाचे वेळापत्रक कधी येणार?

9 months ago
Air india is now fully private company

एअर इंडिया आता पूर्णपणे खासगी कंपनी; कर्मचाऱ्यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

9 months ago
Tulja Bhavani Temple tuljapur

दिवाळी ते नाताळ काळात तुळजाभवानी मंदिर मध्यरात्री एक वाजता उघडणार

8 months ago
letter to cultural minister for tuljapur

तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र, सांस्कृतिक मंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.