तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील भाविक मंजुनाथ मठापती यांनी बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) एक किलो वजनाची चांदीची बिस्किटे श्रद्धापूर्वक अर्पण केली.
मंजुनाथ मठापती हे आपल्या कुटुंबीयांसह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची बिस्किटे अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
या देणगीबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मंजुनाथ मठापती यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, अजीज तांबोळी यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

