• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home POLITICS

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात सामना

Terna Vruttant by Terna Vruttant
August 21, 2025
in POLITICS, BREAKING NEWS, देश-विदेश
0
vice president election 2025
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी (दि. २१ ऑगस्ट) अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभा खासदार राहुल गांधी उपस्थित होते. काल बुधवारी (दि. २० ऑगस्ट) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट सामना होईल.(vice president election 2025)

कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी?

बी. सुदर्शन रेड्डी हे कायद्याच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. ७९ वर्षीय बी. सुदर्शन रेड्डी यांनी २७ डिसेंबर १९७१ रोजी आंध्र प्रदेश बार कौन्सिल, हैदराबाद येथे वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात वकिली केली. २ मे १९९५ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ५ डिसेंबर २००५ रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. पुढे १२ जानेवारी २००७ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले.

Related posts

Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026
Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

May 18, 2026

कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन?

चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन, अर्थात सी. पी. राधाकृष्णन, यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ३१ जुलै २०२४ पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, त्यांनी फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ या काळात झारखंडचे राज्यपाल म्हणून आणि मार्च ते जुलै २०२४ या काळात तेलंगणाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे. तसेच, मार्च ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्यांनी पुद्दुचेरीच्या उपराज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही पाहिला आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होईल. यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट आहे. तर २२ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारांना नामांकन अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे.

Previous Post

धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी; कलेक्टर, एसपिंनी घेतला आढावा

Next Post

ऐतिहासिक निर्णय; पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव “राजगड”

Next Post
New name of Velhe taluka "Rajgad"

ऐतिहासिक निर्णय; पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव "राजगड"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

financial assistance to new entrepreneurs

बँकांनी नव्या उद्योजकांना अर्थसहाय्य करावे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश

1 year ago
MLA - Ranajagjitsinha Patil

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा; ‘डीपीसी’च्या बैठकीत ठराव – आमदार राणाजगजितसिंह पाटील

9 months ago
Mumbai Train Accident : मुंबईत लोकलच्या दारात लटकलेल्या ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, २ गंभीर जखमी

Mumbai Train Accident : मुंबईत लोकलच्या दारात लटकलेल्या ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, २ गंभीर जखमी

1 year ago
Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.