• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 16, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

Terna Vruttant by Terna Vruttant
September 15, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
tuljapur navratri mahotsav tourism status
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथील प्राचीन मंदिर हे देशभरात प्रसिद्ध असून, येथे दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात लाखो भाविकांची गर्दी उसळते. याच अनुषंगाने सन २०२५-२६ या वित्तीय वर्षातील महोत्सव दिनदर्शिकेत “श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव” याला राज्याचा प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (tuljapur navratri mahotsav tourism status)

नवरात्र महोत्सवाच्या दहा दिवसांत तुळजापूर शहर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रंगांनी नटते. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि देशभरातून सुमारे ५० लाख भाविक या कालावधीत दर्शनासाठी हजेरी लावतात. गोंधळी गीत, भजन, नृत्य, शास्त्रीय व लोकसंगीत यांसारखे कार्यक्रम महोत्सवाचा केंद्रबिंदू असतात. राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील ख्यातनाम कलाकारांबरोबरच स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन देण्यात येते.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरच्या आसपास अनेक पर्यटनस्थळे असून, नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबा काका मंदिर, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर, येडशी येथील रामलिंग अभयारण्य आणि परांडा भुईकोट किल्ला हे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. येरमाळा येथील येडेश्वरी देवीला तुळजाभवानीची धाकटी बहीण मानले जाते, त्यामुळे भाविक दोन्ही देवतांचे दर्शन घेतात.

आयोजित उपक्रम
महोत्सव काळात स्थानिक लोककला, लोकनृत्य, गोंधळी गीत, भारुड, जाखडी, गोंधळ, भजन स्पर्धा, किर्तन आदींचे आयोजन होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील सुप्रसिद्ध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर व YouTube चॅनेलवर केले जाईल.

भव्य लोकसंगीत मैफल, ३०० ड्रोनच्या साहाय्याने नवरात्र थीमवर आधारित लाईट शो, जबाबदार व शाश्वत पर्यटन या विषयावर चित्रकला स्पर्धा, व्याख्याने, मॅरेथॉन, पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह, फेअर्स तसेच फॅम टूर्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रसिद्धी व सुविधा
या महोत्सवाची मराठी व इंग्रजी भाषेत यथोचित प्रसिद्धी केली जाणार असून, प्रेस नोट्सही द्विभाषिक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांना महोत्सवात सहभागी होण्याची माहिती दिली जाईल. तसेच महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटनाचा लोगो वापरण्यात येईल.

सुप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाप्रमाणे मराठी व इंग्रजी भाषेत व्यापक प्रसिद्धी केल्यास देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन तुळजापूरच्या नवरात्र महोत्सवाची प्रसिध्दीही त्याच पद्धतीने केली जाणार आहे.या निर्णयामुळे तुळजापूरचा शारदीय नवरात्र महोत्सव केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळाच नव्हे, तर राज्याच्या पर्यटन वृद्धीचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे.

Previous Post

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबर पासून प्रारंभ; जाणून घ्या कार्यक्रमांची रूपरेषा

Next Post

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरला धाराशिव दौऱ्यावर;स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

Next Post
Manoj Jarange patil at Dharashiv

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरला धाराशिव दौऱ्यावर;स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

2 months ago
१५ ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश करताना “डिजी प्रवेश पास” अवश्यक

१५ ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश करताना “डिजी प्रवेश पास” अवश्यक

11 months ago
Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

1 month ago
Tuljabhvani Temple Prsad Seva

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.