• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, April 22, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

Terna Vruttant by Terna Vruttant
March 10, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
Dharashiv HPV

Dharashiv HPV

5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांची माहिती 

धाराशिव : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात एचपीव्ही (HPV) लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, ९ ते १४ वयोगटातील तरुणींना पुढील तीन महिन्यांत ही लस मोफत देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील क्षय रुग्णांना विशेष पोषण कीट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सोमवारी (दि.९) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड नोंदणी व शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात डॉ. घोष यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवी खंदारे, जलसंधारण अधिकारी राऊळ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वाघज यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय वाघज यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. बांधकाम विभागाच्या तीन योजनांमधून यावर्षी दीडशेहून अधिक विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी सांगितले की, जिल्ह्यात HPV लस देण्यासाठी १६ हजार ५०० मुलींची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येकी सुमारे चार हजार रुपये किंमतीची ही लस मुलींना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच जिल्ह्यात संपूर्णता अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून आरोग्य आणि शिक्षण विभागाकडून हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात आरोग्य विभागाची ३५३ कोटी रुपयांची ९४ कामे सुरू असून त्यामध्ये जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर रुग्णालयांच्या इमारतींची कामे सुरू असल्याचे हरिदास यांनी स्पष्ट केले. गुणवत्ता आश्वासक मानकांमध्ये यावर्षी धाराशिव जिल्हा राज्यात पहिला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख २६ हजार २१० लाभार्थ्यांपैकी ७ लाख ५१ हजार ७८७ लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले असून या योजनेत धाराशिव जिल्हा राज्यात १३ व्या क्रमांकावर आहे. तर वय वंदन योजनेत जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार यांनी जिल्ह्यातील घरकुल योजनांच्या कामांची सद्यस्थिती सविस्तरपणे मांडली.

Previous Post

महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post
Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CBSE Board Exam Time Table

‘सीबीएसई’कडून दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर; राज्य मंडळाचे वेळापत्रक कधी येणार?

7 months ago
Dharashiv Sahitya Sammelan

धाराशिवमध्ये 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 

2 weeks ago
ST Mahamandal

एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनाबरोबर

6 months ago
financial assistance to new entrepreneurs

बँकांनी नव्या उद्योजकांना अर्थसहाय्य करावे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!
  • धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड
  • धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.