• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 21, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Terna Vruttant by Terna Vruttant
March 12, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
Annabhau sathe smarak dharashiv

Annabhau sathe smarak dharashiv

8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती 

धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा या स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी निर्गमित केला आहे. विशेष म्हणजे, या जागेसाठी द्यावे लागणारे सुमारे २ कोटी ८ लाख रुपयांचे मूल्य शासनाने माफ केल्याने नगरपरिषदेचीही आर्थिक बचत झाली आहे. त्यामुळे भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच आपण ₹ १.५० कोटी निधी मंजूरही करवून घेतला आहे. पालिका निवडणुकीच्या अगोदर शहरात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अभिवचनही आपण वचननाम्याच्या माध्यमातून शहरवासीयांना दिले होते. ​तत्कालीन महसूलमंत्री ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे जागेच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे ₹ २ कोटी ८ लाख भरणे आवश्यक होते. पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम माफ करण्याची विनंती आपण शासनाकडे केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होऊन ९ जानेवारी २०२६ रोजी महसूल व वन विभागाने या जागेला ‘भोगवटादार वर्ग-२’ अंतर्गत महसूलमुक्त आणि मूल्यरहित तत्वानुसार मंजुरी देत जागा विनामुल्य देण्याचा निर्णय घेतला होता. 

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी धाराशिव शहरातील शीतकरण केंद्राच्या अखत्यारीतील असलेली १ एकर जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली आहे. सोमवारी तसा अधिकृत आदेश त्यांनी जारी केला आहे. त्याचबरोबर या जागेच्या चतुःसिमाही निश्चित करण्यात आल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. या जागेवर भव्य स्मारक, आकर्षक उद्यान आणि सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. स्मारकामध्ये केवळ अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळाच नसेल, तर त्यासोबतच ​सुसज्ज बाग बगीचा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आकर्षक उद्यानही विकसित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित अभ्यास केंद्र हे या स्मारकाचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांची आणि सामाजिक लढ्याची स्मृती जिवंत ठेवणारे हे जिल्ह्यातील पहिले आणि मोठे स्मारक ठरणार आहे.

​व्यापक लोकसहभागाची कृती समिती : आमदार पाटील 

धाराशिव शहरात साकारण्यात येणाऱ्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊंच्या भव्य स्मारकासाठी व्यापक कृती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याची नोंदणी करून बँकेत खाते उघडले जाईल. पारदर्शकता रहावी यासाठी केवळ धनादेशाद्वारे थेट बँक खात्यात लोकसहभाग स्वीकारण्यात येईल. समाजबांधवांसह विविध समाज घटकातील नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्वप्रथम आपण.स्वतः एक लाख रुपयांचा व्यक्तिगत सहभाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Previous Post

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

Next Post

विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 

Next Post
Archna ranajagjitsinha patil zp president

विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Arun Gawali Bail Granted

अरुण गवळीला दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून तब्बल 18 वर्षांनी जामीन मंजूर

11 months ago
Mpsc Exam Updates

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली

10 months ago
Garja Maharashtra Maza Rajyageet

प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत म्हणणे बंधनकारक, अंमलबजावणी न केल्यास कारवाई – मंत्री दादा भुसे

12 months ago
pahalgam tourist point reopen

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली पर्यटन स्थळे खुली

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.