• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, November 17, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

सर्वोच्च न्यायालयाची रु. ३२७ कोटींच्या २०२१ विमा प्रकरणी कंपनीला नोटीस!

Terna Vruttant by Terna Vruttant
November 17, 2026
in मुख्य बातम्या, कृषी, धाराशिव
0
सर्वोच्च न्यायालयाची रु. ३२७ कोटींच्या २०२१ विमा प्रकरणी कंपनीला नोटीस!
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२ लाख २७ हजार शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

Related posts

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

November 17, 2026
भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

November 17, 2026

धाराशिव : जिल्ह्यातील २ लाख २७ हजार शेतकरी बांधवांच्या ३२७ कोटी रुपयांच्या खरीप २०२१ च्या पीक विमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी महत्त्वाची सुनावणी झाली आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीला नोटीस बजावली आहे. त्यामुळे २०२१ पासून नुकसान भरपाईची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कायदेशीर लढाईचे एक महत्वपूर्ण पाऊल पुढे पडले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

खरीप २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी कृषी विभाग आणि विमा कंपनीने संयुक्तपणे पीक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षण अहवालांमध्ये सर्वेक्षणाच्या वेळी सोयाबीनचे पीक शेतात उभे असल्याचे स्पष्ट झाले होते. जवळपास ८० ते ८५ % नुकसान झाल्याचा अहवाल सदर करण्यात आलेला होता. असे असतानाही विमा कंपनीने संपूर्ण नुकसानभरपाई दिली नाही. पीक कापणी प्रयोगाचा आधार घेत केवळ ५० टक्के भरपाई वितरित केली. त्यामुळे उर्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली होती. शेतकरी बांधवांची बाजू विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मे २०२२ रोजी, तर विभागीय समितीने २२ ऑगस्ट २०२२ रोजी पात्र शेतकऱ्यांना उर्वरित ५० टक्के नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. विमा कंपनीने या आदेशांची अंमलबजावणी न केल्याने १८ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुली प्रमाणपत्राची (RRC) कार्यवाहीही सुरू केली. मात्र, विमा कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने उच्च न्यायालयाने या कार्यवाहीला स्थगिती दिली. परिणामी शेतकऱ्यांची भरपाई पुन्हा रखडली.

या प्रकरणातील आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण २ लाख २७ हजार शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरले होते. २ लाख ६४ हजार ८१७ पूर्व सुचनांपैकी क्रॉप कॅलेंडर नुसार पीक काढणीच्या कालावधी नुसार १५ दिवसांपूर्वी आलेल्या पूर्व सूचना ह्या स्थानिक नैसर्गिक आपत्ति या तरतुदी अंतर्गत ३० सप्टेंबर पर्यंत पात्र असणाऱ्या २ लाख २७ हजार शेतकऱ्यांना ६५४ कोटी इतकी रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगाचे भारांकण लाऊन केवळ ३२७ कोटी इतकीच रक्कम शेतकऱ्यांना दिली होती. 

या पूर्वीही माननीय उच्च न्यायालयामध्ये १००% रकमेसाठी मागणी करण्यात आलेली होती. परंतु न्यायालयाने पीक कापणी प्रयोगात उत्पन्न जास्त आल्याने शेतकऱ्यांची याचिका रद्द केली होती. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांसह धाव घेतली होती. हा प्रश्न केवळ काही शेतकऱ्यांच्या भरपाईपुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक हक्काशी संबंधित आहे. 

उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानंतर या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आज सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पुरावे, संयुक्त सर्वेक्षणाचे अहवाल आणि प्रशासकीय समित्यांचे आदेश विचारात घेऊन त्यांना उर्वरित भरपाई मिळावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीला नोटीस बजावल्याने या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे आपले बारकाईने लक्ष राहणार आहे. 

या नोटिशीमुळे शेतकरी बांधवांची बाजू न्यायालयासमोर मांडण्याची पुढील प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम निर्णयानंतर भरपाईचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार!

शेतकरी बांधवांच्या पिकांच्या नुकसानीचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या संयुक्त सर्वेक्षणातही पिके शेतात उभी असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असतानाही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची संपूर्ण भरपाई मिळाली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. उच्च न्यायालयातील निकालानंतरही आपण हा विषय सोडला नाही. शेतकरी बांधवांना न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू ठेवला. आज न्यायालयाने विमा कंपनीला नोटीस बजावली, ही पुढील न्यायालयीन प्रक्रियेतील महत्त्वाची घडामोड आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडली जात आहे. विमा कंपनीच्या वकिलांकडून केस निकाली काढावी, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने आपले म्हणणे ऐकून घेत विमा कंपनीला नोटिस बजावली आहे. कंपनीला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्याची वेळ देण्यात आली आहे. राजकुमार पाटील, प्रशांत लोमटे यांच्यासह शेतकरी बांधवांच्या वतीने ॲड. सुधांशु चौधरी तर सिनियर काउन्सिल ॲड. बलबिर सिंग यांनी राज्य शासनाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळेपर्यंत आपला पाठपुरावा आणि न्यायालयीन लढा सुरूच राहील तसेच खरीप २०२० चे प्रकरणही अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगीतले आहे.

Previous Post

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

Next Post

भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

Next Post
भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

5 months ago
Collector inspects damage in Bhum

भूम येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी

1 year ago
Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

6 months ago
Devendra Fadanvis on Crop Loss Relief

दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत करणार: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा
  • भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार
  • सर्वोच्च न्यायालयाची रु. ३२७ कोटींच्या २०२१ विमा प्रकरणी कंपनीला नोटीस!

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

November 17, 2026
भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

November 17, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.