• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

स्वामीनाथन आणि टाटा फाऊंडेशनशी झालेल्या करारामुळे राज्यात विकासाचे नवे पर्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

Terna Vruttant by Terna Vruttant
October 7, 2025
in BREAKING NEWS, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
maharashtra govt signed mous
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी विभाग आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन त्याचबरोबर ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यात सोमवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यात शेती, महिला सक्षमीकरण, पोषण सुरक्षा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.(maharashtra govt signed mous)

फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हे सामंजस्य करार झाले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनामार्फत शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले जात आहे. महिला शेतकरी हा शेती व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या सहभागातून आपण केवळ उत्पादन नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करू शकतो. पोषण सुरक्षा ही काळाची गरज असून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देत असताना भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठीही हा उपक्रम उपयोगी ठरेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

ग्रामविकास विभागाने टाटा मोटर्सशी केलेला सामंजस्य करार ग्रामीण विकासाला गती देणारा आहे. या कराराच्या माध्यमातून ६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रभावी काम होईल आणि समृद्ध ग्राम मिशनला या सामंजस्य करारामुळे चालना मिळेल. गावांच्या शाश्वत विकासासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी या उपक्रमांमधून सक्षम पायाभूत रचना उभारली जाईल.

या सामंजस्य कराराच्या वेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. सौम्या स्वामिनाथन, टाटा मोटर्स मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कृषी विभाग व एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन यांच्यातील कराराचे ठळक मुद्दे :

* वातावरणीय बदल व पोषण मूल्यांचा विचार करता पारंपरिक व स्थानिक अशा भरड धान्यांच्या उत्पादन व प्रक्रिया शेती उद्योगांना प्रोत्साहन देणे.

* संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या २०२६ या महिला शेतकरी वर्षानिमित्ताने महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी कायद्याची निर्मिती. तसेच सावित्रीबाई फुले महिला शेतकरी सशक्तीकरण अभियानाची निर्मिती.

* पर्यावरणपूरक, पोषक, जैवविविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये बायोहॅपिनेस केंद्रांची निर्मिती.

टाटा मोटर्स फाऊंडेशन व ग्राम विकास विभाग यांच्यातील कराराचे ठळक मुद्दे :

* पालघर जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींमध्ये एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणी नंतर राज्यभरातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये (सुमारे १०० गावे) हा कार्यक्रम

* मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास पूरक कार्यक्रम राज्यातील १० आकांक्षित तालुक्यांमध्ये रावविला जाईल.

* निवडलेल्या प्रत्येक गावात ३ वर्षांच्या कार्यक्रम कालावधीत ग्रामपंचायत व स्थानिक समुदायांच्या सक्षमीकरणातून गावांचा शाश्वत विकास साधणे

* विविध शासकीय योजना आणि कार्यक्रमांच्या तसेच टाटा मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा कार्यक्रम राबवविला जाईल. शासकीय कार्यक्रमांच्या परिणामकारकतेत वाढ करण्याचे उद्दिष्ट

* ग्राम विकास आराखडा तयार करणे, अंमलबजावणीचे सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

Previous Post

मराठ्यांचे वाटोळे शरद पवारांनीच केले – मनोज जरांगे

Next Post

मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार

Next Post
Maratha Reservation High Court News

मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

shri tuljabhavani & shivaji maharaj108 ft sculpture

तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी

7 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

“ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना तातडीने मदत करा” आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

6 months ago
MSRTC Senior Citizens

ज्येष्ठ नागरिकांसाठी ५८५ रुपयांत राज्यभर प्रवास

5 months ago
MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.