• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

Terna Vruttant by Terna Vruttant
September 27, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
tulja bhavani mandir,terna charitable trust
260
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे श्री तुळजाभवानी मंदिर आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी याबात माहिती दिली. (tulja bhavani mandir,terna charitable trust)

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १ कोटी रुपये तसेच तेरणा ट्रस्टच्या वतीने ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे. संस्थानच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामधील पूरग्रस्त भागातील महिलांसाठी एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय अजूनही मंदिर संस्थानच्या वतीने विविध प्रकारचे मदतकार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत वेळोवेळी पुरविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे भाविकांनी दिलेल्या देणगीवर चालते. भाविक आणि मंदिर संस्थान यांचे अतूट नाते आहे. हाच धागा जपत संस्थान नेहमीच सामाजिक बांधिलकी पार पाडत आले आहे. राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती उ‌द्भवल्यास मंदिर संस्थान आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून येते.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

२०१९ मध्येही पूरग्रस्तांसाठी केली होती मदत

याआधीही कोल्हापूर परिसरातील महापुराच्या काळात मंदिर संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले होते. पुण्यातील महापुरावेळीही मंदिर संस्थानने मदतकार्य केले होते. तसेच २०१९ मध्ये पूरग्रस्तांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांची दिली होती.
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच. अतिवृष्टी मुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत. घरांची पडझड झालेली आहे. पिकांचे नुकसान झालेले आहे. जनावरे वाहून गेलेली आहेत. अशा गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात राहून मदतकार्य करण्याचे नियोजन करत आहे.

मंदिर संस्थान संकटाच्या काळात समाजासाठी तत्पर

भाविकांप्रती आणि समाजाप्रती असलेली ही बांधिलकी कायम ठेवत आजही तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. देवीच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते जपत मंदिर संस्थान नेहमीच संकटाच्या काळात समाजासाठी तत्पर राहिले आहे.
आजही तेच धागे पुन्हा घट्ट विणले जात आहेत. पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान त्यांना आधार देत आहे. समाजाप्रती असलेली ही निरंतर बांधिलकी आणि देवीच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते मंदिर संस्थान नेहमीच जपत आले आहे आणि पुढेही जपत राहील.

Previous Post

वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३ दिवसानंतर सापडला

Next Post

खांद्यापासून हात नसलेल्या शीतल देवीचा ऐतिहसिक ‘सुवर्ण’वेध; तिरंदाज स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक

Next Post
Sheetal Devi Won Gold

खांद्यापासून हात नसलेल्या शीतल देवीचा ऐतिहसिक 'सुवर्ण'वेध; तिरंदाज स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Pik Vima

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे शिफारस

2 months ago
shri tuljabhavani & shivaji maharaj108 ft sculpture

तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी

12 months ago
Manoj Jarange dharashiv

स्वराज्य ध्वज स्तंभाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन – धाराशिवमध्ये रंगला भव्य सोहळा

10 months ago
MLA RanaJagjitsinha patil

… तर बँक मॅनेजरवर कारवाई होणार, कर्ज वसुलीबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा थेट इशारा

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.