• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

Big Breaking – सरकारकडून मागण्या मान्य, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं

Terna Vruttant by Terna Vruttant
September 2, 2025
in BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Manoj Jarange dharashiv
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनोज जरांगे पाटील हे कुणबी जातप्रमाणपत्रांसह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज (२ सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. हा दिवस अनेक घडामोडींनी भरलेला होता. या आंदोलनाविरोधातील याचिकेवर दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पाठोपाठ राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले.(Jarange declares big win)

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी मनोज जरांगे आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले. “तुम्हाला आझाद मैदानात केवळ २४ तास उपोषणाला बसण्याची परवानगी दिली होती. तरी तुम्ही कोणत्या अधिकाराने गेल्या चार दिवसांपासून तिथे बसला आहात?” असा प्रश्न उच्च न्यायालयाने जरांगेंच्या वकिलांसमोर उपस्थित केला. त्यावर जरांगे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे उद्या सकाळपर्यंतची मुदत मागितली होती. ही विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने सदर सुनावणी बुधवारी (३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केली आहे.

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

दुसऱ्या बाजूला, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील व उपसमितीतील इतर सदस्यांनी आझाद मैदानात उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला आदेश जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवला.

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारची मान्यता

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस महायुती सरकारने मान्यता दिली असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं. यावर विखे पाटील म्हणाले, “सरकारचा प्रस्ताव आंदोलकांना मान्य झाला की आम्ही त्याची शासकीय अधिसूचना काढू.” यावर जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही अधिसूचना काढा आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो. त्यानंतर तुम्ही आम्हाला मुंबईत थांबा म्हणालात तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही गुलाल उधळून निघून जाणार.”

मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत शासन निर्णय जारी

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू होतं. आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे. दरम्यान, हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय सरकारने जारी केला आहे.

उपोषण सोडताना मनोज जरांगे पाटील भावूक

राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. उपोषण सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, माझ्या समाजाचं कल्याण झालं असं सांगत सर्व आंदोलकांनी आता मुंबईतून पुन्हा आपआपल्या गावी जाताना शांततेत जावं असं आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे.

Previous Post

“उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा”; आंदोलनाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेच्या पात्रता प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

Next Post
Foreign Medical graduates Examination

परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेच्या पात्रता प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Minister Datta Bharane

धाराशिव जिल्हा संपर्कमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

8 months ago
Chhava ride app maharashtra government

आता येणार एसटी महामंडळाचे ‘छावा राइड’ ॲप ! ओला, उबर, रॅपिडोला जबरदस्त पर्याय

10 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

“ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना तातडीने मदत करा” आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

9 months ago
financial assistance to new entrepreneurs

बँकांनी नव्या उद्योजकांना अर्थसहाय्य करावे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.