शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या पुन्हा एकदा बदलीचे आदेश जारी केले आहेत. मुंढे यांची गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीतील ही २३ वी बदली आहे. तुकाराम मुंढे यांची असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. आता ते राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील. त्यांच्यासह इतर चार अधिकाऱ्यांच्याही बदल्यात करण्यात आल्या आहेत.(IAS Officer Tukaram Munde Transferred)
प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करणारे तुकाराम मुंढे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पसंत नसल्याचे दिसून आले आहे.राजकीय नेतृत्वाला,मंत्र्यांना(Minister) आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात.त्यामुळे नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना तुकाराम मुंढे मात्र एका विभागात सरासरी एक वर्षेच काम करताना दिसून येतात.
तुकाराम मुंढे हे २००५ बॅचचे अधिकारी असून गेल्या २० वर्षांच्या कालावधीत त्यांची ही २३ वी बदली ठरली आहे.प्रशासनात काम करताना हा एक वेगळ्या प्रकारे विक्रमच असल्याचे सांगितले जात आहे. तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात तिथे प्रशासन, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सरकारी कार्यालयात(Government office) उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसतो.
महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ते काम करतात.मुंढे यांच्यासह नितीन पाटील, अभय महाजन,ओंकार पवार आणि आशा खान यांच्याही संबंधीत पदावरून दुसर्या विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.