तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सिंहाच्या पुरातत्व खात्यामार्फत जीर्णोद्धाराचे काम सुरु होते. यामुळे दिनांक २० ऑगस्ट पर्यंत देवीचे धर्मदर्शन व देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. दिनांक २१ ऑगस्ट पासून हे दर्शन पुन्हा सुरु करण्यात येईल अशी माहिती तुळजाभवानी संस्थानच्या वतीने परिपत्रक काढून देण्यात आली आहे.(Tuljapur devi daarshan open)
दरम्यान बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धर्मदर्शन व देणगी दर्शन नियमितपणे चालू होणार असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. देविजींचे मुखदर्शन, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व इतर धार्मिक विधी नियमितपणे चालू राहतील असेही संस्थानच्या परिपत्रकात म्हटले आहे.