मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईत आरपारची लढाई केली. आरक्षणाबाबतीत पेच निर्माण झाला होता. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तणाव वाढू लागला होता. या सर्व प्रक्रियेत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. (MLA Ranajagjitsinh Patil’s contribution for maratha reservation)
आंदोलाकांना मदत करण्याबरोबरच उपसमितीला तोडगा काढण्यासाठी विशेष सहकार्य
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीसह आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वातील उपसमितीला हैदराबाद गॅझेट संबंधी प्रस्ताव तयार करण्यासाठी देखील त्यांनी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव दाखल झाले होते. मराठा समाजाच्या आंदोलकांचा सरकारवर रोष वाढू लागला होता. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. गिरीश महाजन, ना. मकरंद पाटील, ना. माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बैठकांच्या फेर्या सुरु होत्या. या सर्वांनी मिळून अत्यंत प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर एकमताने निर्णय घेतले. गेल्या दोन दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील, यावर सविस्तर चर्चा झाली.
सुवर्णमध्य काढण्यासाठी निर्णायक योगदान
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका बजावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या समजून घेऊन त्यात कायदेशीर दृष्ट्या काय मार्ग काढता येईल यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीसोबत विचार विनिमय करण्यात आमदार पाटील यांनी सहाय्य केले. परिणामी संवाद आणि समन्वयाने या विषयावर तोडगा निघाला आणी मराठा बांधवांना अपेक्षित शासन निर्णय काढण्यात आला, असं म्हटलं जात आहे.