2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्ब स्फोटाचा आज मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. कोर्टाने या प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात मोटार सायकलमध्ये स्फोट झाल्याचेही सिद्ध झाले नाही, स्फोट झाल्याचे सिद्ध होत नाही, असे म्हणत कोर्टाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी अशी या सात आरोपींची नावे आहेत. या संपूर्ण खटल्यादरम्यान 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र सुनावणीदरम्यान 40 साक्षीदार फितूर झाले तर 25 साक्षीदारांचा मृत्यू झाला.(Malegon Bomb blast 2008)
कोर्टाने निकाल देताना नोंदवली निरीक्षणे
या प्रकरणाचा निकाल देताना कोर्टाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. हा स्फोट झाल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले पण हा स्फोट मोटार सायकलमध्ये झाल्याचेही सिद्ध झाले नाही. ही. साध्वी प्रज्ञासिंहच्या बाईकचा चेसी नंबरही नीट नव्हता, त्यामुळे ही गाडी प्रज्ञा सिंहची होती हे सिद्ध होत नाही. त्यावर बोटाचे ठसेही आढळले नाहीत. तसेच प्रसाद पुरोहितने आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही, या आरोपींमध्ये बैठका झाल्याचा कोणताही पुरावा नाहीत त्यामुळे कट शिजला हे सिद्ध करायला आवश्यक पुरावे नाहीत असे कोर्टाने या निकालामध्ये म्हटले आहे.
आधी लावलेला मकोका नंतर रद्द
कोर्टाने आधी लावलेला मकोका नंतर रद्द केला त्यामुळे याकाळात घेतलेल्या साक्षही निरर्थक आहेत. UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे UAPA लागू होत नाही. केवळ संशयाच्या आधारे या आरोपींना दोषी ठरवता येत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.