• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

Terna Vruttant by Terna Vruttant
October 14, 2026
in मुख्य बातम्या, आरोग्य
0
नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती   

मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यास मदत व्हावी, या उद्देशाने ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’, हा जखमींवरील उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. या निर्णायक काळात जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.

Related posts

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

October 10, 2026

मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरोग्य विभागाचे संचालक संजय काटकर, वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक डॉ. सुनील भारद्वाज यांच्यासह मोटार वाहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबर अखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.

हवाई रुग्णवाहिका सेवेसह अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. 

‘अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि केवळ मदत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. प्रत्येक जीव अनमोल असून, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’ या भूमिकेतून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी या वेळी दिले.

असेल ‘या’ महामार्गांना प्राधान्य

समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांवर अपघातग्रस्तांना जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेअंतर्गत हवाई रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींना सुरक्षितपणे ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

Previous Post

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Sheetal Devi Won Gold

खांद्यापासून हात नसलेल्या शीतल देवीचा ऐतिहसिक ‘सुवर्ण’वेध; तिरंदाज स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक

1 year ago
'MahaSTRIDE' Meeting Omarga

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत ‘MahaSTRIDE’ प्रकल्पाअंतर्गत उमरगा येथे आढावा बैठक

1 year ago
Cabinet meeting august 2025

मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण, फ्रेट कॉरिडोअरला मंजुरी

1 year ago
75 thousand new houses in dharashiv

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 
  • सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
  • नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

October 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.