• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, October 3, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

धाराशिवच्या १५,७८७ शेतकऱ्यांना १६७ कोटींची कर्जमुक्ती

Terna Vruttant by Terna Vruttant
October 3, 2026
in मुख्य बातम्या, Uncategorized, कृषी, धाराशिव
0
धाराशिवच्या १५,७८७ शेतकऱ्यांना १६७ कोटींची कर्जमुक्ती
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आतापर्यंत जिल्ह्यात ४९,७९४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४५७ कोटी जमा

धाराशिव : कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १५ हजार ७८७ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर तब्बल १६७ कोटी ४६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

Related posts

तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

October 3, 2026
नवरात्रोत्सवासाठी तुळजापुरात प्रशासन सज्ज

नवरात्रोत्सवासाठी तुळजापुरात प्रशासन सज्ज

October 2, 2026

राज्यभरात या टप्प्यात ३ लाख २७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ३ हजार १६० कोटी ४४ लाख रुपये जमा करण्यात आले. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याला १६७ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ला २ जून २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्यानंतर १५ जुलैच्या शासन निर्णयाद्वारे योजनेच्या काही निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली.

योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता (OTS) या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका आणि अन्य खासगी बँका अशा एकूण ५३ बँकांनी सुमारे ३२ लाख कर्जखात्यांची माहिती महा-आयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ९७ हजार ८७३ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ५५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

योजनेच्या निकषांनुसार जिल्ह्यातील सुमारे ६७ हजार ६१९ थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी ५५ हजार ३६३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.

३० सप्टेंबरअखेर राज्यातील सुमारे १५ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १३ हजार २७६ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ४९ हजार ७९४ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ४५७ कोटी १८ लाख रुपये जमा झाले आहेत. यापैकी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४ हजार ७ शेतकऱ्यांना २५ कोटी ८३ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

कर्जमुक्तीनंतर नव्या पीक कर्जाचा मार्ग मोकळा

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी पुन्हा आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. त्यामुळे कर्जमुक्तीबरोबरच संबंधित शेतकऱ्यांसाठी नव्या पीक कर्जाचा मार्गही मोकळा होणार आहे.

उर्वरित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये नाव असलेल्या, मात्र अद्याप आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादीही शासनाकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप यादीत नाव न आलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही पुढील टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

Previous Post

तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

annular lunar eclipse will be visible on September 7th

भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी

1 year ago
Shardiya Navratri 2025

तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस सुरुवात,शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी नऊ दिवस देवी निद्रेत

1 year ago
Mumbai Train Accident : मुंबईत लोकलच्या दारात लटकलेल्या ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, २ गंभीर जखमी

Mumbai Train Accident : मुंबईत लोकलच्या दारात लटकलेल्या ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, २ गंभीर जखमी

1 year ago
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

8 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • धाराशिवच्या १५,७८७ शेतकऱ्यांना १६७ कोटींची कर्जमुक्ती
  • तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात
  • नवरात्रोत्सवासाठी तुळजापुरात प्रशासन सज्ज

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

October 3, 2026
नवरात्रोत्सवासाठी तुळजापुरात प्रशासन सज्ज

नवरात्रोत्सवासाठी तुळजापुरात प्रशासन सज्ज

October 2, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.