• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, May 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

Terna Vruttant by Terna Vruttant
May 27, 2026
in महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Barshi Seed Racket

Barshi Seed Racket

0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी विभागाची धडक कारवाई; 7.52 लाखांचे बोगस बियाणे जप्त, हजारो शेतकरी फसवणुकीपासून बचावले

बार्शी : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात तालुका कृषी विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल 7 लाख 52 हजार 640 रुपयांचे बनावट उडीद बियाणे जप्त केले. या कारवाईमुळेबार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश हजारो शेतकरी संभाव्य आर्थिक फसवणूक आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीपासून वाचल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दि. 26 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरात बोगस उडीद बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने तत्काळ हालचाली करत स्वराज कॉलनी, बार्शी येथील एका गोडाऊनवर छापा टाकला.

Related posts

Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026
Dharashiv Pik Vima

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे शिफारस

May 27, 2026

या कारवाईत शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या “NUL 7 (विश्वास)” या उडीद बियाण्यांच्या नावाने बनावट आणि हुबेहूब नक्कल केलेल्या बॅगा आढळून आल्या.

पथकाने गोडाऊनमधून 216 बॅग जप्त केल्या असून यापूर्वी 168 बॅग विक्री झाल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. एकूण 384 बॅग (प्रत्येकी 5 किलो) असा सुमारे 7,52,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे आणि उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील, निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी सचिन देशमुख सहभागी होते.

दरम्यान, या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या कारवाईनंतर आता कृषी विभाग आणि पोलिसांकडून या बनावट बियाण्यांची यापूर्वी किती शेतकऱ्यांना विक्री झाली आहे, इतर तालुक्यांमध्येही अशा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता का, तसेच या मागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा सखोल तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Senior Journalist Dilip Narikar

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचे निधन

8 months ago
supreme court

Supreme Court : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम

10 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

शेतकऱ्यांच्या मदतनिधीतून कर्जवसुली करू नका, आ. पाटील यांच्या सूचनेनंतर बँकेचे पत्र

8 months ago
Dharashiv dpdc

पीक विम्याचा हप्ता न भरलेल्या ३०% शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीत ठराव

7 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश
  • भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
  • पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे शिफारस

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

May 27, 2026
Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.