• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

बहुभुधारक शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी पाठपुरावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Sagar by Sagar
October 16, 2025
in BREAKING NEWS, Uncategorized, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पशुधन दगावले आहे, विहिरी खचल्या आहेत, गाळाने भरल्या आहेत तर अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीनच महापुरामुळे खरडून गेली आहे. अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या अनुदानातून दिलासा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अशा बिकट परिस्थितीत दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या अभुतपूर्व नुकसानीतून सावरण्यासाठी बहुभूधारक शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे. गरजेनुसार क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून दिलासा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.(MLA Ranajagjitsinha Patil)

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसान भीषण आहे. जिल्ह्यातील ७३३ गावांना अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेला आहे. जिल्ह्यातील ९ जणांचा यात बळी गेला. महापुरात बुडून मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आपण तातडीने मदत दिली आहे. ९ पैकी ७ कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे २८ लाख रुपयांच्या मदतीचे आत्तापर्यंत वितरण करण्यात आले आहे. दोन प्रस्ताव प्रलंबित असून त्याची रक्कमही लवकरच संबधित कुटुंबाला देण्यात येईल. संपूर्णपणे खचलेल्या विहिरींची संख्या १३९७ एवढी आहे तर २८६ विहिरींचे अंशतः नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील एकूण १६८३ विहिरी खचल्या आहेत. यात भूम तालुक्यातील सर्वाधिक ७२३ विहिरींचा समावेश आहे तर त्यापाठोपाठ परंडा तालुक्यातील ५४० विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यातील २५, तुळजापूर ३०, उमरगा २८, लोहारा १६, कळंब २२ तर वाशी तालुक्यात १३ विहिरींचे नुकसान झाले आहे. जे अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या विहिरीसाठी सरकारी अनुदान आणि मदत मिळणार आहेच मात्र बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारकडे आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

जिल्ह्यातील एकूण ४२७ गावातील तब्बल ८८७९ हेक्टर जमीन महापुरामुळे खरवडून गेली आहे. परंडा तालुक्यातील सर्वाधिक ३९०० हेक्टर तर त्यापाठोपाठ कळंब तालुक्यातील १७६१ आणि भूम तालुक्यात १६७५ हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. धाराशिव तालुक्यातील १७४ हेक्टर, तुळजापूर तालुक्यात ७४ हेक्टर, उमरगा ३६२ हेक्टर आणि वाशी तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे. गाळ साचलेल्या जमिनीचे क्षेत्रही मोठे आहे. जिल्ह्यातील ९ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर गाळ साचलेला आहे. या सगळ्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी मोठे रचनात्मक काम करावे लागणार आहे. त्यासाठी अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारी अनुदान आणि मदत मिळणार आहेच. अगदी त्याचप्रमाणे बहुभूधारक शेतकऱ्यांनाही खरवडून गेलेल्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी मदत मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.

यंदाच्या पावसाळ्यात एक जूनपासून ते आजवर जिल्ह्यात मयत झालेल्या जनावरांची संख्याही मोठी आहे. दुधाळ मोठी, दुधाळ लहान, ओढकाम करणारी मोठी आणि लहान असे एकूण ५९० इतके पशुधन दगावले आहे. येथेही प्रति जनावर राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र या नुकसानीचा फटका बहुभूधारक शेतकरी बांधवांना बसू नये त्यांनाही सरकारी नियमाप्रमाणे आर्थिक दिलासा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. राज्य सरकार अत्यंत संवेदनशीलपणे विचार करीत असून या सर्व शेतकरी बांधवांनाही नक्कीच दिलासा दिला जाईल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. याव्यतिरिक्त क्राऊड फंडिंगच्या माध्यमातूनही आपण ज्यांना ज्यांचे नुकसान खूप जास्त आहे त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Previous Post

खरडून गेलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी २९२.४९कोटी अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post
MLA Ranajagjitsinha Patil

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी २९२.४९कोटी अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Government impliment mejor changes from 1october

ऑक्टोबरपासून गॅस, ऑनलाइन गेमिंग, UPIसह ७ महत्त्वाचे बदल; सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम

9 months ago
Oath of Vice President C.P. Radhakrishnan

सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

9 months ago
Tulja Bhavani Temple tuljapur

दिवाळी ते नाताळ काळात तुळजाभवानी मंदिर मध्यरात्री एक वाजता उघडणार

8 months ago
Manoj Jarange On High court Decision

मोठी अपडेट; न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.