• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, April 26, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षणाची सोडत जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

Terna Vruttant by Terna Vruttant
October 14, 2025
in BREAKING NEWS, Uncategorized, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Dharashiv ZP Election
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५५ गटांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनुसार एकूण ५५ जागांपैकी ५० टक्के म्हणजेच २८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.(Dharashiv ZP Election)

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे, आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम २०२५ नुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पडली.

Related posts

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026

आरक्षणाची प्रवर्गनिहाय स्थिती:

* एकूण जागा: ५५

* महिलांसाठी आरक्षित: २८

* अनुसूचित जाती (SC): एकूण ९ जागा,

त्यापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव.

* अनुसूचित जमाती (ST): १ जागा.

* नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): एकूण १४ जागा, त्यापैकी ७ जागा महिलांसाठी राखीव.

* सर्वसाधारण (General): एकूण ३१ जागा, त्यापैकी १६ जागा महिलांसाठी राखीव.

गटनिहाय आरक्षणाचा तपशील:

जिल्हा परिषद मुलांची शाळा, धाराशिव येथील विद्यार्थी- शाबान मोबीन सय्यद, सय्यद जैन शाहीद, आरीप वाजीद सय्यद व अब्दुल्ला नवाब शेरीकर यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.

* अनुसूचित जाती (महिला): वडगाव (सि), सिंदफळ, डिकसळ, येरमाळा, व सास्तूर.

* अनुसूचित जाती (सर्वसाधारण): सिंदफळ, काक्रंबा, शहापूर, वडगाव (सि), सांजा, डिकसळ, येरमाळा, खामसवाडी व सास्तुर यापैकी महिला आरक्षण वगळून उर्वरित गट.

* अनुसूचित जमाती: ढोकी.

* नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): काटी, सुकटा, येणेगुर, वालवड, तुरोरी, मोहा आणि लोणी.

* सर्वसाधारण (महिला): कोंड, जळकोट, तेर, मंगरूळ, ईट, बलसूर, कुन्हाळी, पारगाव, केशेगाव, माकणी, आनाळा, पारा, कानेगाव, अंबेजवळगा, कदेर व जेवळी.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 31 निवडणूक विभाग आरक्षित झाले आहे.त्यापैकी 16 विभाग हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. आष्टा, तेरखेडा, ईटकुर, नायगाव, पाडोळी, बेंबळी, शेळगाव,जवळा (नि), डोंजा , अणदूर, नंदगाव,कवठा,गुंजोटी, दाळींब आणि आलुर, ईट, पारगाव, पारा, कोंड, तेर, अंबेजवळगा, केशेगाव अनाळा, जळकोट, मंगरूळ, कानेगाव, माकणी, जेवळी, बलसूर व कदेर यांचा समावेश असून सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झालेले निवडणूक विभाग कोंड ,जळकोट, तेर मंगरूळ, ईट, बलसूर, कुन्हाळी, पारगाव, केशेगाव, माकणी,अनाळा,पारा,कानेगाव,अंबेजवळगा,कदेर व जेवळी या विभागाचा समावेश आहे.

या आरक्षण सोडतीवेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

प्रवीण दरेकरांकडून धाराशिव जिल्ह्यातील गाव दत्तक; 254 कुटुंबांना प्रत्येकी 2 हजारांची दिवाळी भेट अन् 25 लाखांचा निधी

Next Post

जिल्ह्यात आजपासून विशेष ग्रामसभांचे आयोजन, पंचनाम्याचे जाहीर वाचन होणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post
MLA Ranajagjitsinha Patil

जिल्ह्यात आजपासून विशेष ग्रामसभांचे आयोजन, पंचनाम्याचे जाहीर वाचन होणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

3 months ago
Chandrashekhar Bavankule Nagari satkar tuljapur

राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामुळेच तुळजापूरचा कायापालट – महसूलमंत्री बावनकुळे

9 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पहाणी

7 months ago
सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!
  • धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड
  • धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.