• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, September 10, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

१८ गायी, २३ शेळ्या, १०० कोंबड्या दगावल्या; सर्वस्व गमावलेल्या दातखिळे कुटुंबियांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट

Terna Vruttant by Terna Vruttant
October 4, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
MLA Ranajagjitsinha Patil
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अतिवृष्टी आणि महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या भूम तालुक्यातील दातखिळे कुटुंबाला सर्वतोपरी बळ देण्याचा निर्धार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. पावसामुळे बाणगंगा नदीला आलेल्या पुरात तेलगाव पिंपळगाव येथील श्रीराम दातखिळे (वय ५५) यांच्या १८ गायी, २३ शेळ्या,१०० कोंबड्या वाहून गेल्या. २३ सप्टेंबर रोजी आलेल्या या संकटाने दातखिळे कुटुंबीय़ांचे ६० लाखाहून अधिक  रुपयांचे नुकसान झाले आहे. मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दसऱ्याच्या दिवशी दातखिळे कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. शासनाच्या विविध योजनांसह क्रॉउड फंडिंगच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाच्या सहकार्याने दातखिळे आणि अशा सगळ्याच शेतकरी कुटुंबांना उभारी देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.(MLA Ranajagjitsinha Patil)

मृत जनावरांसाठी शासकीय अनुदान व कर्जसवलती मिळवून देण्याचे, राष्ट्रीय पशुधन अभियान आणि केंद्रपुरस्कृत इतर योजनांमधून मदत मिळवून देण्याचे अभिवचनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिले. श्री दातखिळे यांच्या मुलाचे बी.फार्मसी पर्यंत शिक्षण झालेले आहे. तातडीने त्याला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती (PMEGP)व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती  (CMEGP) योजनेच्या माध्यमातून औषधांचे दुकान सुरू करण्यासाठी मदत मिळवून देण्याबाबतही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. पुरामुळे खरवडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून जमीन दुरुस्त करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

सरकार सोबतच समाजानेही पुढाकार घ्यावा

अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. जमिनी खरवडून गेल्या आहेत, फळबागा कोसळल्या आहेत, रोजगाराचे साधन असलेले पशुधन वाहून गेले आहे. अशा परिस्थितीत या सर्व कुटुंबांना पुन्हा एकदा सक्षमपणे उभे करण्यासाठी राज्य सरकार सोबतच समाजातील संवेदनशील घटकांनीही पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन करीत आपण या सर्व कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे आहोत आणि शासनाच्या योजना तसेच समाजातून उत्स्फूर्तपणे पुढे आलेली सगळी मदत या सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

शासकीय योजना व क्रॉउड फंडिंगच्या माध्यमातून मदत

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन मदत मिळवून देण्याची भूमिका आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मांडली. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांसाठी फक्त शासकीय अनुदानावर अवलंबून राहून भागणार नाही. शासनाच्या योजनांसोबत समाजाच्या विविध घटकांचे सहकार्यही मोलाचे ठरणार आहे. क्राउड फंडिंग उभारून मोठया प्रमाणात  नुकसान झालेल्या  कुटुंबांना थेट मदत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

दातखिळे कुटुंबाची जिद्द प्रेरणादायी : आमदार पाटील

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उभारी घेण्याची दातखिळे कुटुंबाची जिद्द प्रेरणादायी आहे. अशा प्रकारे जास्त नुकसान झालेल्या इतर कुटुंबांनाही या योजनांच्या माध्यमातून मदत पोहोचविण्याचे आपले विशेष प्रयत्न सुरू राहतील. दसऱ्याच्या दिवशी दिलेला हा दिलासा म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आशेचा किरण ठरला आहे. शासन व समाजाच्या संयुक्त प्रयत्नातून दातखिळे यांच्यासह अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले शेतकरी बांधवाचे कुटुंब पुन्हा स्वाभिमानाने उभे राहतील, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील व्यक्त केला.

Previous Post

राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट; उपोषण स्थगित करण्याची केली विनंती

Next Post

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

Next Post
MLA Ranajagjitsinha Patil

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Women safety

धाराशिव आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित ; ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

6 months ago
Terna Engg CET admission-guidance-program

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी-2026 प्रवेश प्रक्रियेवर विभागीय सुसंवाद कार्यक्रम

3 months ago
Cabinet Sub-Committee on Maratha Reservation

मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील

1 year ago
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.