• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, January 21, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

“सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत” मुख्यमंत्र्यांची घोषणा

Terna Vruttant by Terna Vruttant
September 24, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
“सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत” मुख्यमंत्र्यांची घोषणा
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली होती. त्यानुसार सगळे निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात येईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवंद्रजी फडणवीस यांनी बुधवारी उजनी (ता. औसा, जि. लातूर) येथे केली आहे. अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(CM Devendra Fadanvis Dharashiv Visit)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुधवारी दुपारी औसा येथील हेलिपॅडवर आगमन झाले. तेथून त्यांनी मोटारीने उजनी गाठली.  सोबत मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील होते. १२ सप्टेंबर रोजी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे उजनीला पाण्याचा वेढा पडला होता. दुसऱ्याच दिवशी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उजनीला भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनंतर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना मराठवाड्यावर ओढवलेल्या आपत्तीबाबत माहिती दिली होती.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील काही भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर ते औसा परिसरातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. उजनीत पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रासह मराठवाडा, लातूर, धाराशिव जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आणि ते पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे धान्यासह संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळेच आपण स्वतः पाहणी करण्यासाठी येथे आलो असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी नमूद केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, की ही परिस्थिती पाहूनच शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो, की सर्व निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या या जाहीर  घोषणेचे उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. टंचाईच्या परिस्थिती ज्या उपाययोजना केल्या जातात, तशाच उपाययोजना आता करण्यात येतील. ज्यांच्या घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत केली जाणार असल्याचे सांगत त्यासाठी मदतीचा २३०० कोटींचा पहिला हप्ता कालच जारी करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे. आता या नुकसानीची पाहणी झाल्यानंतर तातडीने ही मदत केली जाईल. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा आवर्जून नमूद केल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

यावेळी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

Next Post

एकनाथ शिंदेंसमोर तानाजी सावंत भडकले

Next Post
mla tanaji sawant on sanjay raut

एकनाथ शिंदेंसमोर तानाजी सावंत भडकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Manoj Jarange on sharad pawar

मराठ्यांचे वाटोळे शरद पवारांनीच केले – मनोज जरांगे

4 months ago
आरक्षणप्रश्नी सुवर्णमध्य काढण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्णायक योगदान

आरक्षणप्रश्नी सुवर्णमध्य काढण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्णायक योगदान

5 months ago
MLA - Ranajagjitsinha Patil

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी विशेष ग्रामसभा घ्या- आमदार राणाजगजितसिंह पाटील

3 months ago
integrated draft plan dharashiv

पर्यटन स्थळांचा प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत निश्चित करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.