महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे शहर देशभरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. याच पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजापूर नवरात्र महोत्सव २०२५ भक्ती आणि सांस्कृतिक सोहळ्यांच्या उत्साहाने साजरा होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज विशेष धार्मिक विधींबरोबरच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील सुप्रसिद्ध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत.(Sharadiya Navratra Utsav Tulajapur 2025)
या महोत्सवात अनेक मान्यवर कलाकार सहभागी होऊन आपली कला सादर करतील-रोहित राऊत, पं. जयरामतीर्थ मेवुंडी, अभिजीत जाधव, फोक लोक स्टुडिओ, शाहीर रमाणंद उगले, रसिकार्पण डान्स अकॅडमी, राणा जोगदंड लोकसंगीत समूह, फोक आर्टिस्ट्स एन्सेम्बल तसेच विशेष आकर्षण म्हणून ३०० ड्रोन लाईट स्पेक्टॅकल. त्यांच्या सहभागामुळे नवरात्र महोत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता, सांस्कृतिक वैभवाचा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. तसेच, जिल्ह्याचा लौकिक वाढवणाऱ्या महिलांचा महोत्सवाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याचा आनंद आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
०९ दिवस चालणा-या महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा
सोम, २२ सप्टेंबर – रोहित राऊत (इंडियन आयडॉल फेम) भक्तिसंगीत व ऑर्केस्ट्रा
मंगळ, २३ सप्टेंबर – पं. जयतीर्थ मेवुंडी विशेष दर्शन व शास्त्रीय संगीत संध्या
बुध, २४ सप्टेंबर – अभिजीत जाधव लोकसंगीत मैफल
गुरु, २५ सप्टेंबर – फोक लोक स्टुडिओ लोकसंगीत मैफल
शुक्र, २६ सप्टेंबर – शाहीर रामानंद उगले लोकसंगीत मैफल
शनि, २७ सप्टेंबर – रसिकर्पण डान्स अकॅडमी लोकनृत्य सादरीकरण
रवि, २८ सप्टेंबर – राणा जोगदंड लोकसंगीत मैफल
सोम, २९ सप्टेंबर – ड्रोन शो ३०० ड्रोनद्वारे नवरात्र थीम लाईट शो
मंगळ, ३० सप्टेंबर – फोक आख्यान भव्य लोकसंगीत मैफल
स्थळ: श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर, नळदुर्ग रोड








