• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, January 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home Uncategorized

पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; तुमची माहिती ‘अशी’ केली जाईल गोळा, वाचा सविस्तर

Terna Vruttant by Terna Vruttant
September 8, 2025
in Uncategorized, देश-विदेश
0
Census 2027
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करोनामुळे 2021 साली होऊ न शकलेली जनगणना आता होऊ घातली आहे. यासंदर्भातील पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं आहे. यावेळची जनगणना ही काही बाबतींत वेगळी ठरली आहे. कारण यावेळी गोळा केल्या जाणाऱ्या माहितीमध्ये जातीसंदर्भातील माहितीचाही समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय, पहिल्यांदाच ही माहिती गोळा करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर होणार आहे. 2026-27 या काळात दोन टप्प्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी देशभरातील जवळपास 34 लाख कर्मचाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.(Census 2027)

देशातली पहिली डिजिटल जनगणना

यंदा होणारी जनगणना ही देशातली पहिली डिजिटल जनगणना ठरली आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया अर्थात जनगणनेची जबाबदारी असणाऱ्या RGI ने प्रत्यक्ष लोकांची माहिती गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच मोबाईल फोनवर जनगणनेची माहिती गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानंतर मोबाईलमधील हा डेटा केंद्रीय सर्व्हरवर ट्रान्सफर केला जाईल. कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये खास जनगणनेसाठी तयार करण्यात आलेलं अॅप डाऊनलोड करून दिलं जाईल. या अॅपवर इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्येही माहिती जमा करता येणार आहे. अँड्रॉइड व आयओएस अशा दोन्ही प्रणालींवर हे अॅप वापरता येईल.

Related posts

पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

December 5, 2025

बहुभुधारक शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी पाठपुरावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

October 16, 2025

इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे. त्यानुसार, जर काही कारणास्तव माहिती गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याने मोबाईल अॅपवर माहिती न घेता काददावर नोंदी करून घेतल्या, तर नंतर त्यांना ती सगळी माहिती यासंदर्भातील विशिष्ट अशा वेबसाईटवर अपलोड करावी लागेल. या पद्धतीमुळे आधीप्रमाणे गोळा केलेली माहिती पुन्हा एकदा स्कॅन करणे, ऑनलाईन भरणे या गोष्टी टाळता येणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच प्रत्यक्ष माहिती घेण्याचं काम डिजिटल पद्धतीने केलं जाणार आहे.

दोन टप्प्यांत होणार जनगणनेचं काम

दरम्यान, जनगणनेचं काम दोन टप्प्यांत केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर 2026 या काळात घरांबाबतची माहिती गोळा केली जाईल. त्यात घराची अवस्था, घरातील सोयी-सुविधा आणि प्रत्येक घरानिशी असणारी मालमत्ता याबाबतच्या माहितीचा समावेश आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून त्यात प्रत्यक्ष व्यक्तींची माहिती गोळा केली जाईल. लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड ही राज्ये वगळता इतर ठिकाणी याच पद्धतीने जनगणना होईल. या राज्यांमध्ये सप्टेंबर 2026 मध्ये जनगणनेचं काम केलं जाईल.

स्वयंगणनेची व्यवस्था

यावेळी पहिल्यांदाच नागरिकांना स्वयंगणनेची (Self Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात नागरिकांना जनगणनेची माहिती गोळा करून घेणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. ते स्वत:च संबंधित संकेतस्थळावर जनगणनेसंदर्भातील माहिती भरून देऊ शकतात.

प्रत्येक इमारतीचं जिओ-टॅगिंग!

डिजिटल माहिती आणि स्वयंगणनेसोबतच यंदा जनगणनेदरम्यान Geo Tagging च्या सुविधेचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक इमारतीला जिओ टॅग केलं जाणार आहे. यासाठी डिजिटल लेआऊट मॅपिंग (DLM) आणि हाऊसलिस्टिंग ब्लॉक्स (HLB) यांची मदत घेतली जाईल.

Previous Post

प्रतीक्षा संपली; मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे सप्टेंबरपासून धावणार

Next Post

सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार

Next Post
Chagan Bhujbal on maratha reservation GR

सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Crime dharashiv news

तरुणींचे पोलिसांवर आरोप, मात्र गुन्हा दाखल करण्यास पुणे पोलिसांकडून नकार; पोलिसांनी दिलेलं पत्र मुलींनी फाडलं

6 months ago
Garja Maharashtra Maza Rajyageet

प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत म्हणणे बंधनकारक, अंमलबजावणी न केल्यास कारवाई – मंत्री दादा भुसे

6 months ago
Tuljapur devi daarshan open

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

6 months ago
Aksharvel Organization Dharashiv

“अक्षरवेल” महिला साहित्य मंडळाने केली पूरग्रस्त शाळकरी मुलांना मदत

4 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.