• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, November 5, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

शेतकरी, शेतमजूर व मागासवर्गीय कुटुंबांना

Terna Vruttant by Terna Vruttant
November 5, 2026
in मुख्य बातम्या, कृषी, धाराशिव
0
शेतकरी, शेतमजूर व मागासवर्गीय कुटुंबांना
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुष्काळात प्रत्येकी २५ हजारांची द्या मदत

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी

Related posts

राघुच्यावाडीत २५० एकरांवर चारा लागवडीचा शुभारंभ

राघुच्यावाडीत २५० एकरांवर चारा लागवडीचा शुभारंभ

November 2, 2026
अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

October 31, 2026

परंडा –  धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कुटुंबे तसेच मागासवर्गीय समाजातील नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच इतर मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने परंड्याच्या तहसीलदारांना देण्यात आले.

या निवेदनात दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मागासवर्गीय कुटुंबांना, शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर पात्र कृषी कर्जातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाशी समन्वय साधून कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पात्र बाधित कुटुंबाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ तसेच इतर संबंधित महामंडळांकडून कर्ज घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी किंवा कर्जवसुलीत सवलत द्यावी. नवीन कर्जप्रकरणे मंजूर करून पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मागासवर्गीय कुटुंबांच्या जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, चाऱ्याची उपलब्धता करावी आणि आवश्यक पशुधन संरक्षणाच्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच दलित वस्त्यांमध्ये बोअरवेलमधील पाणी कमी झालेल्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

महिला बचतगटांच्या कर्जदारांना कर्जमाफी देऊन कर्जवसुली तात्पुरती थांबवावी, दलित वस्त्यांमधील महिलांनी खासगी फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जांची तातडीने वसुली थांबवावी, तसेच मागासवर्गीय कुटुंबांना स्वाधार योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.

या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेशचे सचिव संजयकुमार बनसोडे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन परंड्याच्या तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी धाराशिव आणि परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Previous Post

राघुच्यावाडीत २५० एकरांवर चारा लागवडीचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Only BJP can transform Dharashiv city - MLA Ranajagjitsinh Patil

भाजपाच करु शकेल धाराशिव शहराचा कायापालट -आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
Anti-drug campaign to be implemented across the district

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
long distance train canceled due to heavy rain

पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना फटका, काही रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या, पाहा वेळापत्रक

1 year ago
Raj Thackeray

“…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”, राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतकरी, शेतमजूर व मागासवर्गीय कुटुंबांना
  • राघुच्यावाडीत २५० एकरांवर चारा लागवडीचा शुभारंभ
  • अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

राघुच्यावाडीत २५० एकरांवर चारा लागवडीचा शुभारंभ

राघुच्यावाडीत २५० एकरांवर चारा लागवडीचा शुभारंभ

November 2, 2026
अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

October 31, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.