• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, October 31, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

Terna Vruttant by Terna Vruttant
October 31, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला जिल्हाभरातून प्रतिसाद

किराणा साहित्य, फराळ किटचे वाटप तर कुठे पशुधनासाठी पाणवठे

Related posts

बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई

बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई

October 30, 2026
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

October 30, 2026

धाराशिव : जिल्ह्यातील अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. अनावश्यक खर्च टाळून गरजू कुटुंबांना मदत करावी, संकटात असलेल्या बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या या आवाहनाला जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुरुवारी दिवसभर वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, दिवाळी फराळ व किराणा साहित्य वाटप, रुग्णसेवा, अनाथ मुलांना भोजन, पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था तसेच विकासकामांच्या उद्घाटनासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

ढोकी येथे भाजपा नेते प्रमोद देशमुख यांनी गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांग बांधवांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी तब्बल १,७०० दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. यावेळी गुणवंतराव देशमुख, गफार काजी, संग्राम देशमुख, सिराज मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. धाराशिव शहरात मनोगत सिनगारे, डॉ. धीरज वीर, राजाभाऊ सोनटक्के, नगरसेवक राजाभाऊ पवार, रवी मुंडे आणि प्रणित सिनगारे यांच्या वतीने पालावर राहणाऱ्या १०० भटक्या कष्टकरी कुटुंबांना किराणा साहित्याच्या दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. 

दगड फोडणारे, शेळीपालन आणि फळविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. तसेच तेरणा महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथे भाजपा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश सुनील बागल व मित्रपरिवाराच्या वतीने जनावरांसाठी पाणवठ्याची व्यवस्था करण्यात आली. धारासुर मर्दानी मंदिरात आरती, तर हजरत खाजा शमशोदिन गाझी दर्गा येथे चादर अर्पण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. 

नळदुर्ग येथे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी विविध उपक्रम राबविले. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप, ‘आपलं घर’ प्रकल्पातील अनाथ मुलांना स्नेहभोजन आणि चिवरी येथील गोशाळेतील गायींसाठी एक ट्रॉली कडबा देण्यात आला. शहरातील विविध भागांत मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १० ते १२ सिमेंटचे हौदही बसविण्यात आले. उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, निरंजन राठोड, रीजवान काझी, राणी सुरवसे, छमाबाई राठोड, सुशांत भुमकर, सुधीर हजारे, बलदेव ठाकूर, सुनील चौधरी, प्रविण गायकवाड, धीमाजी घुगे, श्रमिक पोतदार, विनायक पुदाले, सिकंदर काझी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या उपक्रमांत सहभागी झाले. यावेळी गोशाळा चालक अकबर शेख यांचीही उपस्थिती होती. 

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील चैतन्य मूकबधिर निवासी संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रविण चव्हाण यांच्या वतीने मध्यान्ह भोजन देण्यात आले. यावेळी अलियाबादचे उपसरपंच अमृतराव चव्हाण, आनंद सरकार लाटे, मंदार पुदाले, धर्मराज देडे, कुणाल बेले यांच्यासह शिक्षक व मित्रपरिवार उपस्थित होता. धाराशिव शहरातही वाढदिवसाचे औचित्य साधून धाराशिव नगर पालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली. 

प्रभाग क्रमांक १५ मधील फकीरा नगर येथील मातंग समाज मंदिर सभागृह आणि अंतर्गत रस्त्याचे, तसेच रसुलपुरा येथील जफर किराणा घर ते जुबेर पठाण घर या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बांधकाम सभापती अभिजीत काकडे, पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, नगरसेवक राजकन्या अडसुळे गोरे, दाजीअप्पा पवार, सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह दत्ता पेठे, पृथ्वीराज दलनायक, अप्पा धावारे, दादा वाघमारे, शिवाजी क्षिरसागर, अमित बनसोडे, अरुण पेठे, रॉबिन बगाडे, मिलिंद पेठे, सचिन पेठे, अजय देवकुळे आदी उपस्थित होते. वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही कृतीची जोड दिली. 

दुष्काळाच्या संकटात माणसांसोबतच मुक्या जनावरांची तहान भागविण्यापासून ते गरजूंची दिवाळी गोड करण्यापर्यंत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.

Previous Post

बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maharashtra Local Body Election

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी! सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ

1 year ago
Anti-drug campaign to be implemented across the district

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

1 year ago
Hockey Asia Cup 2025

8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतानं आशिया कप 2025 वर कोरलं नाव, कोरियावर 4-1 नं विजय

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!
  • बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई
  • आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई

बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई

October 30, 2026
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

October 30, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.