• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, November 20, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२६ कोटींच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा

Terna Vruttant by Terna Vruttant
November 20, 2026
in मुख्य बातम्या, कृषी, धाराशिव
0
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२६ कोटींच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

धाराशिव : खरीप २०२० मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाच्या पीकविम्यापोटी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुमारे २२६ कोटी रुपयांच्या भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील ताज्या घडामोडीत शेतकऱ्यांची बाजू मान्य झाली असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घ न्यायालयीन लढ्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. ही माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Related posts

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

November 20, 2026
धाराशिव नगर परिषदेला मिळणार तीन अग्निशमन वाहने

धाराशिव नगर परिषदेला मिळणार तीन अग्निशमन वाहने

November 20, 2026

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काढणीनंतर शेतात ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पावसात भिजल्याने दाण्यांना मोड आले, तर अनेक ठिकाणी सोयाबीन सडून गेले. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.

या परिस्थितीत पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अपेक्षित असताना, नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत दिली नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून अनेक शेतकऱ्यांचे विमा दावे नाकारण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा विषय सातत्याने लावून धरला आणि न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून पाठपुरावा केला.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. या निर्णयाला विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, तेथेही कंपनीला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर उर्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील ताज्या घडामोडींमुळे सुमारे २२६ कोटी रुपयांची भरपाई पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या लढ्यात शेतकऱ्यांनी अनेक वर्षे संयम राखत आपल्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष केला. या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे कायदेतज्ज्ञ, मार्गदर्शक आणि संबंधित सर्वांचे आमदार पाटील यांनी आभार मानले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या भक्कम पाठबळाबद्दलही त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात भरपाई रक्कम जमा होईपर्यंत पुढील पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले. हा केवळ आर्थिक भरपाईचा विषय नसून शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि न्यायासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Previous Post

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

आरोग्य सेवेत धाराशिव जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी !

आरोग्य सेवेत धाराशिव जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी !

1 month ago
Local Crime Branch Dharashiv

नवरात्र उत्सवा दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना बेड्या; गुन्हे शाखेची कामगिरी 

1 year ago
Pik kapani prayog

पिक विमा शेतकऱ्यांसाठी तारणहार; पिक कापणी प्रयोग महत्वाचे ठरणार

1 year ago
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

7 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२६ कोटींच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा
  • ‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी
  • धाराशिव नगर परिषदेला मिळणार तीन अग्निशमन वाहने

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

November 20, 2026
धाराशिव नगर परिषदेला मिळणार तीन अग्निशमन वाहने

धाराशिव नगर परिषदेला मिळणार तीन अग्निशमन वाहने

November 20, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.