मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. या घटनेनंतर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून सर्व लोकल गाड्यांना ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्यात येतील असं सांगण्यात आलं. या निर्णयाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, “लोकलला दरवाजे बसवले तर लोक गुदमरुन मरतील. किती गर्दी असते त्याची तुम्हाला कल्पना आहे का..?”
“आपल्याकडे बाहेरुन येणारे लोंढे आहेत त्यामुळे रेल्वे व्यवस्था कोलमडली आहे. रेल्वेचा, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत, वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, कोण जातंय तुम्हाला माहिती नाही”, असं देखील राज ठाकरे म्हणाले.