छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून या निर्णयाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. याबाबतचं राजपत्र लवकरच जारी होईल. वेल्हे तालुक्यातल्या ७० पैकी ५८ ग्रामपंचायती आणि पुणे जिल्हा परिषदेने हा नाव बदलाचा ठराव मंजूर केला होता.या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.(New name of Velhe taluka “Rajgad”)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा ऐतिहासिक निर्णयाला मान्यता दिली आहे. वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता दिली. विशेष म्हणजे या नावाचे ऐतिहासिक महत्त्व, वेल्हे गावकऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी लक्षात घेऊन राजगड नावाला केंद्र सरकारने मान्यता देण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.