आझाद मैदानावर ५ हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिली होती. मात्र आझाद मैदाना व्यतिरिक्त संपूर्ण मुंबई शहरात मराठा आंदोलक आलेले आहेत. वाजत मैदानात त्यांना जागा अपुरी पडत आहे. परिणामी मुंबईत प्रचंड गर्दी वाढली आहे. परिणामी आंदोलन थांबवावे अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात अली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. दरम्यान उद्या दि २ सप्टेंबर पर्यंत सरकारने ४ वाजेपर्यंत रस्त्यांवरून आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.(high court on maratha protest)
ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत, त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलावीत. उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते खाली करावेत असा महत्त्वाचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारपर्यंत खाली करावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून आज (1 सप्टेंबर) तातडीची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत उच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरिक्षण उच्च न्यायालयाने सांगितले. तसेच सदर याचिकेवर उद्या (2 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्या आदेशाच पालन झालं की नाही ते राज्य सरकारला न्यायालयात सांगाव लागणार आहे. तसेच सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटेन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.