मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवरील उतारावर असलेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने त्याने समोर असलेल्या अनेक चारचाकी आणि मालवाहू वाहनांना जबर धडक दिली.या धडकेत अनेक चारचाकी वाहने, मालवाहू ट्रक यांना धडक दिली. यात वाहने अक्षरशः चक्काचूर झाली. बोरघाटातल्या बोगद्यामध्ये अनेक वाहनांची टक्कर झाल्याचे म्हटले जात आहे. खोपोलीनजीकच्या बोरघाटातील बोगद्यामध्ये हा अपघात झाला आहे.(Mumbai pune xpress way Accident)
सुदैवाने जीवित हानी नाही, जखमींवर उपचार सुरु
या भीषण अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. अनेक प्रवासी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापतींनी जखमी झाले आहेत. यातील बसचा चालक गंभीर जखमी असल्याचे म्हटले जात आहे. जखमींना तातडीने खोपोलीतील नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.