• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली

Terna Vruttant by Terna Vruttant
September 26, 2025
in BREAKING NEWS, INFORMATIVE, करिअर, महाराष्ट्र
0
Mpsc Exam Updates
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २८ सप्टेंबरला राज्याच्या ३६ जिल्हा केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. एमपीएससीने अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर पहिल्यांदाच ही परीक्षा होणार आहे. मात्र, राज्यभर असलेल्या पूर परिस्थितीमुळे तूर्ताशी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह आता अनेक संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय नेते करत आहेत.(Mpsc Exam Updates)

मात्र एमपीएससीने एक परिपत्रक जाहीर केले असून आयोग परीक्षा पुढे ढकलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. पुढील पाच दिवस राज्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अगोदर झालेल्या पावसामुळे या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले आहे.तरीही आयोग परीक्षा घेण्यावर ठाम आहे हे पतिपत्रकातून स्पष्ट झाले आहे.

Related posts

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026

एमपीएससीने काय कारण दिले ?

यासंदर्भात आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एमपीएससीकडून परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे. तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. परीक्षा ही प्रत्येक जिल्हा केंद्रावर होणार असल्याने विद्यार्थ्यांना पोहोचणे शक्य होणार आहे. यासाठी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोचून सुरळीत परीक्षा द्यावी असे सांगत त्यांनी सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

असे आहे आयोगाचे परिपत्रक –

(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

(२) उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे” काळजीपूर्वक अवलोकन करावे.

(३) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.

(४) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.

(५) परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही.

(६) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही.

(७) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

(८) पडताळणी/तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल.

(९) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.

(१०) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

(११) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.

(१२) कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

Previous Post

‘सीबीएसई’कडून दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर; राज्य मंडळाचे वेळापत्रक कधी येणार?

Next Post

पिक विमा शेतकऱ्यांसाठी तारणहार; पिक कापणी प्रयोग महत्वाचे ठरणार

Next Post
Pik kapani prayog

पिक विमा शेतकऱ्यांसाठी तारणहार; पिक कापणी प्रयोग महत्वाचे ठरणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित

9 months ago
Tuljapur devi daarshan open

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

7 months ago
MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

5 months ago
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन;कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला

सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन;कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.