धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टिग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी धाराशिव जिल्ह्याला २९२.४९ कोटी रुपयांच्या अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(MLA Ranajagjitsinha Patil)
जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्त नागरिकांना २९२.४९ कोटींचे अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. २ हेक्टर पर्यंतच्या मदतीचा हा शासन निर्णय असून येत्या काळात आणखी मदत जाहीर होणार आहे. सदर २९२.४९ कोटी रुपये वितरीत करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये ही मदत खात्यावर जमा होऊ शकते.
या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.








