• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, January 26, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

Terna Vruttant by Terna Vruttant
October 9, 2025
in BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Mahavitaran appeals to electricity employees
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मागील काही महिन्यांपासून विद्युत क्षेत्रामधील खाजगीकरण विरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीनही शासकीय विज कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळत आहे. खाजगीकरणाच्या विरोधात अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ८ ऑक्टोबर रोजी बुधवारी मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे आता कंपन्यांमधील वीज यंत्रनेचा संपूर्ण भार हा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर येणार आहे. यावरुन महावितरणने विज कर्मचाऱ्यांना कामांवर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.(Mahavitaran appeals to electricity employees)

वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी ७२ तासांच्या संपाला सुरवात केली आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
Tuljapur Drone Show

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

January 3, 2026

राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली आहे. बैठकीत खाजगीकरण व पुनर्रचनेसह संयुक्त कृती समितीच्या इतर सर्व मुद्द्यांशी सुसंगत व सकारात्मक भूमिका व्यवस्थापनाने स्पष्ट केली आहे. त्याचे लेखी इतिवृत्तही संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहे.

हा संप टाळण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यवस्थापनाने वेळोवेळी प्रत्यक्ष चर्चा केली आहे. मात्र सर्वच मागण्यांशी पुरक असलेली स्पष्ट भूमिका जाहीर करूनही संयुक्त कृती समितीने संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे, असे महावितरणने म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्र अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या संकटातून सावरत आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. दिवाळी सण देखील काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमिवर संपामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या कार्यालयांमध्ये विनाविलंब रूजू व्हावे. पूर परिस्थितीच्या संकट काळात तसेच सणासुदीच्या दिवसांत तत्पर वीज सेवा देत नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Previous Post

राज्यातील नऊ विद्यापीठांना राबवता येणार ऑनलाइन अभ्यासक्रम

Next Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी विशेष ग्रामसभा घ्या- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post
MLA - Ranajagjitsinha Patil

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी विशेष ग्रामसभा घ्या- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Arun Gawali Bail Granted

अरुण गवळीला दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून तब्बल 18 वर्षांनी जामीन मंजूर

5 months ago
Anti-drug campaign to be implemented across the district

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

6 months ago
मराठा आरक्षणासाठी अंतिम लढा; २९ ऑगस्टला ‘चलो मुंबई’ 

मराठा आरक्षणासाठी अंतिम लढा; २९ ऑगस्टला ‘चलो मुंबई’ 

7 months ago
Dr. Ankita Vyavare succeeds in FMGE exam

एफ एम जी ई परीक्षेत तुळजापूरच्या डॉक्टर अंकिता व्यवहारे यांचे यश

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.