राज्याच्या राजकारणामध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चर्चेमध्ये आले आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा जंगली रम्मी खेळातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु असतानाच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा एक नवा कारनामा समोर आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे कृषीमंत्री कोकाटे प्रकरणाबाबत छावा संघटनेने निवेदन दिले. मात्र हे निवेदन देताना त्यांनी पत्ते फेकले. यामुळे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. यामुळे सूरज चव्हाण यांचा थेट राजीनामा घेण्यात आला आहे.(Ajit Pawar On Suraj Chavan )
नेमके प्रकरण काय?
सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली. सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना जोरदार मारहाण केली. यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील जबर मारहाण केल्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दणका दिला आहे. Ajit pawar asks to suraj chavhan for resignation अजित पवार यांनी मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला आहे.
अजित पवार यांनी X वर पोस्ट करत माहिती दिली
या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट करुन माहिती दिली आहे. अजित पवार यांनी लिहिले आहे की, “काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे,” असा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.