• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, January 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home POLITICS

महायुतीच्या मंत्र्यांमध्ये जुंपली; संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात कामकाजावरून वाद

Terna Vruttant by Terna Vruttant
July 26, 2025
in POLITICS
0
sanjay shirsath
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंत्री संजय शिरसाट व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या लेटर वॉरमुळे महायुतीतील वाद समोर आलाय. कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून बैठका घ्या, असे पत्र शिरसाटांनी मिसाळ यांना लिहिले होते. यावर मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून बैठका घेईन, असे उत्तर मिसाळ यांनी दिले. दरम्यान महायुती सरकारकच्या दोन मंत्र्यांमध्ये कामकाजावरून सुरु असेलेला वाद चव्हाट्यावर आला आहे . (sanjay shirsath and madhuri misal letter war)

नेमके प्रकरण काय आहे?

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि  सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठक घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याच्या आरोपावरुन संजय शिरसाट यांनी खरमरीत पत्र लिहिले होते. सामाजिक न्याय विभागातील कामकाज मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याच वाटप झाले असताना राज्यातील काही आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती. या बैठकांची माहिती शिरसाट यांना मिळाल्यानंतर शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.

Related posts

Solapur Mumbai flight service inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis

सोलापूर मुंबई विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

October 15, 2025
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 9 निर्णय! झोपडपट्टीपासून तुकडाबंदीपर्यंत महत्वाचे ठराव

October 7, 2025

राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले उत्तर

मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना शासनाच्या १५० दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे दिलेले निर्देश उघड केले आहेत. आपल्या बैठका ही जबाबदारीचा भाग असल्याचे सांगितले. १९ मार्च २०२५ रोजी झालेले मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातील कामकाज वाटप महाराष्ट्र शासन नियमावली १९७५ नुसार मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय झाले आहे. याशिवाय, मागील काही वर्षांतील विभागीय कार्यवाहीची माहितीही उपलब्ध नसताना, मिसाळ यांनी कोणतीही तक्रार न करता काम केल्याचे सांगितले. मिसाळ यांनी अशा बैठकींसाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा अधिकार असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.

रोहित पवारांची वादात उडी, X वरील पोस्ट चर्चेत

बिनेट मंत्र्यांना डावलून राज्यमंत्री परस्पर बैठका घेत असतील तर हे नक्कीच योग्य नाही. समाजकल्याण खात्यात हे सुरु असून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ साहेबांना डावलून राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ या बैठका घेत आहेत, याचा अर्थ काय घ्यायचा? सामाजिक न्याय मंत्र्यांना घरी जाण्याचे तर संकेत यातून दिले जात नाहीत ना? तसं असेल तर सद्यस्थिती बघता अपवाद म्हणून याचं स्वागतच करायला हवं! अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी X वर केली आहे.

कॅबिनेट मंत्र्यांना डावलून राज्यमंत्री परस्पर बैठका घेत असतील तर हे नक्कीच योग्य नाही. समाजकल्याण खात्यात हे सुरु असून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ साहेबांना डावलून राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ या बैठका घेत आहेत, याचा अर्थ काय घ्यायचा? सामाजिक न्याय मंत्र्यांना घरी जाण्याचे तर संकेत… pic.twitter.com/gOBfLeAscc

— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 26, 2025
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

Next Post
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA Ranajagjitsinha Patil

शेतकऱ्यांच्या मदतनिधीतून कर्जवसुली करू नका, आ. पाटील यांच्या सूचनेनंतर बँकेचे पत्र

4 months ago
Tulja Bhavani Darshan VIP Pass Rates Increased

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन महागणार; २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू

5 months ago
Aksharvel Organization Dharashiv

“अक्षरवेल” महिला साहित्य मंडळाने केली पूरग्रस्त शाळकरी मुलांना मदत

4 months ago
ST Mahamandal

एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनाबरोबर

3 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.