शेगाव, शिर्डी व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तुळजापूरचा विकास व्हावा, अशी दीर्घकाळची मागणी भाविकांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सातत्याने होत होती.तुळजापूरचे आमदार तथा भाजप नेते राणा जगजीतसिंह पाटील यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर राज्य सरकारने १६८८ कोटी रुपयांचा व्यापक तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला असून, लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.(Grand Civic felicitation)
याबद्दल तुळजापूरकरांच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रताप सरनाईक,मंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा उद्या गुरुवारी सायंकाळी तुळजापुरात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याची तयारी सुरू आहे.तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असूनही येथे योग्य ते नियोजन, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षितता आणि भाविकांसाठी सुविधा यांचा अभाव अनेक वर्षांपासून होता. भाविकांसाठी सुलभदर्शन तसेच मूलभूत सुविधा निर्माण करतानाच या आराखड्यात पर्यटन विकास तसेच प्राचीन धार्मिक, ऐतिहासिक संदर्भ साकारण्यात येणार आहेत.

उद्या सायंकाळी भवानी कुंड परिसरात भव्य नागरी सत्कार
आराखड्यातून तुळजापूर शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. ऐतिहासिक निधी मंजुरीबद्दल तुळजापूरकरांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, मंत्री जयकुमार गोरे, भाजप नेते तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात केला आहे. हा सत्कार समारंभ गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भवानी कुंड, पार्किग परिसरात होणार असून संपूर्ण तुळजापूर शहरात या कार्यक्रमासाठी तयरी सुरु आहे.