जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी सुलेमान शाह याचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईत दहशतवादी अबू हमजा आणि यासिर हे देखील मारले गेले आहेत. भारतीय जवान पहालगाम हल्ल्यापासून या दशदवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवत होते. सरकारने सुलेमान शाहवर 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
अनेक तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्यांना कंठस्नान
या कारवाईबाबत लष्कराच्या चिनार कॉर्प्सने त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर माहिती दिली आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मते, गुप्तचर माहितीच्या आधारे लिडवास परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक तास चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सध्या या परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू आहे, अशी माहिती ही देण्यात आली आहे
दहशतवाद्यांना उध्वस्त कारणारे ‘ऑपरेशन महादेव’
‘ऑपरेशन महादेव’ हे अलीकडच्या काळात काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाविरुद्धची एक मोठी मोहीम मानली जाते. या ऑपरेशन मुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले. हे ऑपरेशन या गोष्टीचे संकेत देते की, लष्कर आणि इतर सुरक्षा दल दहशतवादाला मुळापासून संपवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. शिवाय त्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी अचूक रणनीतीसह कार्यरत आहेत हेच स्पष्ट झाले आहे.
संयुक्त कारवाई
भारतीय लष्कर, आणि स्थानिक पोलीस यांच्यासह CRPF यांच्यातील समन्वयाने हि संयुक्त कारवाई करण्यात आली होती. ऑपरेशन महादेव संयुक्त पद्धतीने आणि अधिक सावधगिरी बाळगून ऑपरेशनची रणनीती तयार केली जात आहे. परिणामी दहशदवादी तळ नष्ट करण्यात भारताला सातत्याने यश येत आहे.