• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
June 9, 2025
in महाराष्ट्र, धाराशिव
0
कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती “मित्र” चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या उर्वरित पाण्याबद्दल आकडेवारीसह विस्तृत माहिती दिली. तसेच हे पाणी धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यांना लवकर मिळावे यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत याबाबतही सविस्तर मांडणी केली. पुणे येथील कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात नुकतीच कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाबाबत नुकतीच बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली राज्याचे मुख्यमंत्री असताना कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती दिली. केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या पर्यावरणाशी निगडित मान्यता मिळवून घेतल्या. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला. २०२२ साली मराठवाड्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या या २३.६६ टीएमसी पाण्याच्या प्रकल्पाला फडणवीस साहेबांमुळे ११,७२६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यामुळेच ७ टीएमसी पाण्याची कामे सध्या पूर्णत्वाच्या टप्प्यात आली आहेत. मात्र उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी अद्याप मिळालेले नाही. त्यासाठीही मुख्यमंत्री सकारात्मक असून मित्रच्या माध्यमातून उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर सकारात्मक प्रयत्न करण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शविली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

कृष्णा पाणी तंटा लवाद एकच्या आकडेवारीनुसार कृष्णा खोऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या हक्काचे ५९९ टीएमसी पाणी आजघडीला उपलब्ध आहे. त्यापैकी चांगला पाऊसकाळ झाल्यानंतरही केवळ ५२० टीएमसी पाणी महाराष्ट्र राज्याकडून वापरात आणले जात आहे. ४० टीएमसी पाण्यासाठी आवश्यक कामे हाती घेण्यात आली आहेत.त्यामुळे शिल्लक राहिलेल्या ३९ टीएमसी पाण्यातून मराठवाड्याचा न्याय हक्क असलेले १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावत २००१ साली मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून दिली होती.त्यात वाढ करून २००९ मध्ये २३.६६ टीएमसी पाण्याला मंजुरी दिली.त्यातील ७ टीएमसीचे पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. मात्र मराठवाड्याच्या हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत. मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड हे दोन जिल्हे कृष्णा खोऱ्यात आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचा या पाण्यावर न्याय हक्क आहे. या २३.६६ टीएमसी पाण्याच्या प्रकल्पाला महायुती सरकारने ११ हजार ७२६ कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यताही दिलेली आहे. त्यामुळे आता उर्वरीत पाण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

तांत्रिक व कायदेशीर बाबींच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्र्यांकडे उच्चस्तरीय बैठक

कृष्णा तंटा लवाद क्रमांक १ नुसार आंतरखोरे पाणी वाटपास कोणतीही कायदेशीर अडचण नाही. त्यामुळे हा विषय जलद गतीने पूर्ण करण्यासाठी व तांत्रिक आणि कायदेशीर बाबीवर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.या विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या पुर्ततेनंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना याबाबत अवगत करण्यात येणार आहे.देवेंद्रजीनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला,प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करून घेतला त्यामुळेच ७ टीएमसीचा विषय पूर्णत्वास जात आहे.याबाबत देखील त्यांचे सहकार्य आपल्याला मिळणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण हा विषय पुढे घेऊन जात असून याबाबत सर्वांनी सकारात्मक राहून याबाबत सहकार्य करावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे

Previous Post

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

Next Post

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

Next Post
दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

कृष्णेच्या पुराचे पाणी येणार मराठवाड्यात, १०० किलोमीटर बोगदा प्रस्तावित

कृष्णेच्या पुराचे पाणी येणार मराठवाड्यात, १०० किलोमीटर बोगदा प्रस्तावित

9 months ago
Nagarparishad Dharashiv women's day

महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

4 days ago
Pump House Inauguration

पडसाळी, दारफळ पंपगृहाचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

7 months ago
Tuljabhvani Temple Prsad Seva

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

8 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.