नागपूर: राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या 3 डिसेंबर रोजी होणे अपेक्षित होते मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यावर स्थगिती देत 21 तारखेला निकाल देण्याबाबत आदेश दिले आहेत.
राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुकांवर स्थगिती आल्याने निवडणूक आयोगाकडून त्या ठिकाणांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्याची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी पार पडणार होती. परंतु आता निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच मतदानाची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्यास सांगितले आहे.









