धाराशिव तालुक्यातील वरवंटी अपसिंग शिवारात वाघ आढळून आला आहे. आज (दि ०४) सकाळी वरवंटी अपसिंग शिवारातील महादेव टेकडीच्या परिसरात डोंगरावर सकाळी साडेदहा अकरा वाजेच्या सुमारास काही तरुणांनी हा वाघ पहिला असल्याची माहिती आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Tiger at dharashiv)
वाघ दिसल्यानंतर काही तरुणांनी हुल्लडबाजी करत वाघाला हुसकावून लावले आहे. यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यातून डिसेंबर महिन्यात आलेला हा वाघ गेल्या नऊ महिन्यांपासून धाराशिव येथील येडशी-रामलिंग अभयारण्य परिसरात वास्तव्यास आहे.वाघ आता धाराशिव शहरापासून काहीच अंतरावर आढळला आहे. यावर आता वनविभागाने दक्षता घ्यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी दक्षता घ्यावी, उपाययोजना सुरु – आमदार राणाजगजितसिंह पाटील
वरवंटी अपसिंग शिवारात वाघ आढळून आला आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली असून पिंजरा लावण्याच्ये काम सुरु आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, गावोगावी दवंडी देण्याचे काम सुरु आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आमदार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.