बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित नाईपर, जीपॅड व इतर स्पर्धा परीक्षांसाठी तेरणा फार्मसी विभाग झाला उत्तम प्लॅटफॉर्म
धाराशिव : शहरातील तेरणा इंजीनियरिंग कॉलेजच्या फार्मसी विभागातील नऊ विद्यार्थ्यांनी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मासुटिकल एजुकेशन अँड रिसर्च (नाईपर) तर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत यश मिळविले आहे. नाईपर हे राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालय आहे आणि जेथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी नाईपर, जेईई प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि पात्र व्हावे लागते.
यंदाच्या शैक्षणिक वर्षी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथील फार्मसी विभागातील आकांक्षा वाघमारे, अंजली राजुरे, लक्ष्मण लेंगुले, करुणा सुरवसे, निकिता जाधव, अपि॓ता कानेगावकर, रूतुजा गोमसाळे, अदित्य भडंगे, व अभिषेक राजमाने हे नऊ विद्यार्थी नाईपर परीक्षेत पात्र झाले आहेत. मागील चार वर्षांमध्ये सातत्याने नाईपर व जीपॅट परीक्षांमध्ये तेरणा फार्मसीचे विद्यार्थी यश मिळवत आहेत. त्यामुळे तेरणा फार्मसी विभागात विद्यार्थ्यांमध्ये नाईपर,जीपॅट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी फार्मसीचे विद्यार्थ्यांमध्ये चुरस व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घवघवीत यशामुळे फार्मसी विभागाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रा.ए. आय. काझी यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले म्हणून त्यांनाही महाविद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. पी. टी. माने, विभागीय शैक्षणिक समन्वयक डॉ. आर. बी. नानवरे, तसेच संपूर्ण प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.